सर्वांत धोकादायक ‘आर्थिक जिहाद’ आणि तो रोखण्यासाठीचे उपाय !
‘जगभर इस्लामचा जिहाद चालू आहे. त्यांच्या शस्त्रास्त्र जिहादविषयी जवळपास सर्वांनाच ठाऊक आहे; पण महत्त्वाचे, म्हणजे एकूण जिहादपैकी केवळ २.५ टक्केच जिहाद शस्त्रास्त्रांचा आहे. आपल्या देशात लव्ह जिहाद, भूमी (लँड) जिहाद, वैद्यकीय जिहाद, शिक्षण जिहाद, कला जिहाद इत्यादी जिहाद चालू आहेत. त्यांतील केवळ लव्ह जिहादच बहुतेक हिंदूंना ज्ञात आहे. या सर्वांखेरीज आर्थिक जिहादही चालू आहे, जो अत्यंत धोकादायक आहे. त्याविषयी आपल्या समाजात जागरूकतेचा अभाव दिसून येतो. आर्थिक जिहाद हा एक संथ जिहाद आहे, जो अतिशय शांतपणे आणि प्रभावीपणे चालू आहे. त्याचा परिणाम थेट दिसत नाही. हलाल जिहाद हा त्याचा केवळ एक भाग आहे. अशा प्रकारे आर्थिक जिहाद अत्यंत चतुराईने केला जात आहे आणि त्यात अनेक राजकीय पक्षांचेही मोठे योगदान आहे.
१. आर्थिक जिहादचे स्वरूप आणि त्याची पद्धत
अ. पूर्वीच्या काळी हिंदू सर्व प्रकारची कष्टाची कामे स्वतः करत असत. त्यातून ते त्यांचा उदरनिर्वाह चालवत असत. कपडे शिवणे, इलेक्ट्रिकल दुरुस्तीचे काम, प्लंबिंग काम, फळविक्रेते, न्हावी, लाकूडकाम, वेल्डिंग, पंचर काढणे, वाहन दुरुस्ती, जरीचे काम, भरतकाम, कार्पेट काम, ढाबा, उपाहारगृह, बेकरी, इमारतीचे बांधकाम, बिर्याणी बनवणे, डाईंग आणि प्रिंटिंग, परफ्युमरी, मांस व्यवसाय, कपड्यांची विक्री, पादत्राणांचे दुकान यांखेरीज भंगार व्यवसाय, संगणक उपकरणे हे सर्व व्यवसाय मुसलमान समाजाकडे जात आहेत. सर्व हस्तकलेची कामेही हिंदूंच्या हातातून मुसलमानांच्या हातात जात आहे.
आ. देहली, गाझियाबादच्या भागात छत आणि इमारत बनवण्याचे काम बांगलादेशी मुसलमानांच्या कह्यात आहे. या भागातील रेल्वेस्थानकांवर फळे विकण्याचे कामही तेच लोक करतात. पूजा साहित्याच्या व्यवसायात त्यांची घुसखोरी वाढत आहे. त्यांनी कलेच्या क्षेत्रातही शिरकाव केला आहे, ज्याचे सर्वात मोठे उदाहरण ‘बॉलीवूड’ आहे. त्या माध्यमातून जिहाद पसरवला जात आहे. मुंबई-पुणे परिसरात बिर्याणी विक्रीचे काम त्यांच्या हातात आहे. मांस व्यवसायात त्यांची मक्तेदारी वाढत आहे. मांस व्यवसायातून त्यांना सर्वाधिक मिळकत होते. गुजरात आणि राजस्थान यांच्या महामार्गांवरील बहुतांश हॉटेल्स ही मुसलमानांची आहेत. या हॉटेल्सना हिंदु देवतांची नावे आहेत.
इ. पूर्वी मुंबईत मंगलदास मार्केटच्या बाहेर हिंदु विक्रेत्यांची लहान लहान दुकाने असायची; पण आता सगळीकडे मुसलमानच आले आहेत. जवळपास सर्वत्र चांगले कपडे शिवतांना मुसलमान शिंपी दिसतील. बहुतेक ते महिलांचे कपडे शिवतात, ज्यामध्ये सतत काम उपलब्ध असते आणि भरपूर लाभही मिळतो. मोठ्या शहरांमध्ये आधुनिक व्यायामशाळा आणि ‘मसाज पार्लर’ यांचे संचालकही मुसलमानच आहेत.
ई. धर्मांधांची मुले लहानपणापासूनच वाहने दुरुस्त करणे आणि पंक्चर काढणे अशी कामे करू लागतात. धर्मांध केस कापण्याचे आणि सौैंदर्य वर्धनालयाचे (ब्युटी पार्लरचे) साहित्य बनवून विकण्याचे कामही करत आहेत. ‘हबीब’ आणि ‘शहनाज हुसैन’ या नावांनी चालू असलेल्या ‘ब्युटी पार्लर’च्या अनेक दुकानेही त्यांचीच आहेत. हिंदूंच्या विवाह सोहळ्यात त्यांच्या स्त्रिया केवळ वधू-वरांना मेंदी लावण्याचे काम करतात. काश्मिरी हस्तकला आणि शाल बनवण्यावर त्यांची पूर्ण मक्तेदारी आहे. त्यांची देशाच्या कोणत्याही कानाकोपर्यात दुकाने आहेत आणि ते तेथे वस्तू विकतांना दिसतात. आपल्या कोणत्याही मोठ्या सणांमध्ये, जसे की गणेशपूजा, नवरात्री इत्यादी, वाजंत्री, ‘डीजे’, गाणे आणि नृत्य करणारे हेही तेच असतात. जुन्या वाहनांचे सुटे भाग चोरून त्यांची नासधूस करण्याचे कामही काही जण करत आहेत.
उ. ते नियोजनबद्ध पद्धतीने संपूर्ण बाजारपेठ व्यापत आहेत. ज्या व्यवसायात अल्प व्यय, कष्ट अल्प आणि हेराफेरी करून अधिक नफा मिळवता येतो, तोच व्यवसाय ते निवडतात. नंतर हळूहळू ते त्यांची मिळकत वाढवत जातात. त्यांना व्यवसाय चालू करण्यासाठी जकातच्या (जो मुसलमानांमध्ये वर्षातून एकदा वार्षिक उत्पन्नाचा ४० वा भाग दानधर्मात दिला जातो.) माध्यमातून साहाय्य केले जाते, तसेच हवालाच्या माध्यमातूनही त्यांना आखाती देशांतूनही साहाय्य मिळते.
ऊ. अनेक मशिदी आणि मदरसे यांमध्ये माहिती गोळा केली जाते आणि आर्थिक जिहादसाठी योजना बनवल्या जातात. त्यांना अनेक मदरशांमध्ये बाजारावर पकड कशी मिळवायची ?, याचे व्यावहारिक ज्ञान दिले जाते. हिंदूंमध्ये जन्मदर अल्प असल्याने हिंदु कामगार सहज उपलब्ध होत नाहीत. मुसलमान कुटुंबांमध्ये तरुण आणि काम करणार्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे हिंदु व्यावसायिकांनाही त्यांना कामावर ठेवावे लागते.
ए. मतांच्या राजकारणामुळे त्यांना उद्योगधंदे उभारतांना विविध सुविधा आणि सूट मिळते. मांस व्यवसायामध्ये वस्तू आणि सेवा कराचा (जी.एस्.टी.चा) दर अल्प ठेवण्यात आला आहे. सरकारी यंत्रणा त्यांना प्रत्येक स्तरावर साहाय्य करते. ते बहुतेक काम रोखीने करतात. त्यामुळे त्यांच्या मिळकतीची गणना करणे कठीण होते. अर्थात, ते कर वाचवतात आणि त्यांच्याकडे पुरेसे पैसे आहेत. लाच देऊन, तसेच इतर गुन्हेगारी आणि अनधिकृत कामे करून ते पैसे कमावतात.
२. आर्थिक जिहाद पसरवण्यात हिंदूंचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष साहाय्य
हिंदू हे नेहमीच कार्याभिमुख आणि कष्टाळू असतात; परंतु काही वर्षांपासून त्यांच्या विचारसरणीमध्ये आणि स्थितीमध्ये पालट होत आहे. डाव्या विचारसरणीचे शिक्षण घेतल्यानंतर हिंदु समाज स्वतःच्या कामांकडे दुर्लक्षित दृष्टीने पाहू लागला आहे. तो सरकारी आणि अन्य नोकर्या यांना अधिक प्राधान्य देऊ लागला आहे. त्यामुळे त्याने हळूहळू आपले व्यवसाय करणे बंद केले. परिणामी, ते व्यवसाय धर्मांधांच्या कह्यात जाऊ लागले. नोकरीमुळे आपले कुटुंब विस्कळीत झाले; कारण आपल्याला नोकरीसाठी इतर शहरात जावे लागले. वाढती महागाई आणि महागडे शिक्षण, यांमुळे आपल्या कुटुंबातील मुलांची संख्या अल्प झाली. संख्याबळामुळेही आपण कमकुवत झालो आणि रोजगार मिळवण्यासाठी शिक्षण हाच पर्याय शिल्लक राहिला. कोणतेही काम करण्यासाठी मनुष्यबळ लागते; पण नोकरी एकट्याने करता येते. आपण लोक परंपरागत कामे करण्याचे ज्ञानही विसरलो. आपल्या शिक्षणपद्धतीने कष्टाची कामेही दूर केली. कोणतेही तांत्रिक ज्ञान आणि कौशल्य नसतांना आपले हिंदु तरुण नोकर्या मिळवण्यासाठी हताशपणे रस्त्यावर फिरत आहेत.
३. हिंदूंचे शहरांमध्ये स्थलांतर
उत्तर भारतातील गावांची स्थितीही चांगली नाही. गावांतील तरुण रोजगारासाठी शहरांत स्थलांतर झाले. त्यामुळे गावातील हिंदु कुटुंबे न्यून होत आहेत. भविष्यात अशी सर्व घरे आणि भूमी धर्मांधांकडून कह्यात घेतली जाण्याचा धोका आहे. युरिया आणि कीटकनाशके यांमुळे शेती लाभदायी ठरत नसल्याने मोठ्या संख्येने हिंदु कुटुंबांचे स्थलांतर वाढत आहे. हिंदु कुटुंबात धार्मिक ज्ञानाचा अभाव, श्रमातून चोरी करणे, कष्टाचे पैसे उपभोगाच्या साधनांमध्ये उधळणे, स्वार्थी वृत्ती, कौटुंबिक आणि सामाजिक दायित्वांविषयी उदासीनता, दिखाऊपणा, ऐषोआरामाचे जीवन जगल्यामुळे आजारांचे प्रमाण वाढणे इत्यादी कारणांमुळे आर्थिक जिहादला बळ मिळते. स्वत:चा कोणताही व्यवसाय करायचा असेल, तर कौटुंबिक आणि सामाजिक सहकार्याची आवश्यकता असते.
ज्या कुटुंबात अधिक क्रियाशील सदस्य आहेत, ते कुटुंब सहजपणे स्वतःचा व्यवसाय करू शकते. हिंदु कुटुंबातील संख्याबळ अल्प झाल्यामुळे व्यवसाय चालवतांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. बहुतांश व्यवसाय बंद ठेवावे लागल्याचे दिसून आले आहे. सामाजिक आणि धार्मिक संस्थांकडून कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण दिले जात नसल्यामुळे हिंदु समाजातही ही समस्या निर्माण होत आहे. डाव्या विचारसरणीचे शिक्षण आणि प्रसारमाध्यमे यांनी हिंदु तरुणांची दिशाभूल करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यामुळे आज हिंदु तरुण काहीसे भरकटले आहेत. हिंदूंच्या जीवनशैलीतील दिखाऊपणा आणि उधळपट्टी हेही या समस्येचे एक कारण आहे.
४. आर्थिक जिहाद थांबवण्यासाठी उपाय !
सर्वांत महत्त्वाची गोष्ट, म्हणजे आपल्याकडे अजूनही वेळ आहे. त्यामुळे आपण या विषयावर धोरण आखून गांभीर्याने काम केले, तर हे येणारे संकट आपण थोपवू शकतो. सर्वप्रथम आपल्या समाजात श्रमाविषयी आदराची भावना निर्माण केली पाहिजे. हिंदु तरुणांना आवश्यक प्रशिक्षण सहज उपलब्ध करून दिले पाहिजे. प्रशिक्षण दिल्यानंतर आपल्या हिंदु तरुणांना काम मिळण्यासाठी जाळे (नेटवर्क) सिद्ध करावे लागेल. त्यांना मंदिरांनी शक्यतो मोफत किंवा अल्प शुल्क आकारून प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करावी. त्यात प्रारंभीपासून शेवटच्या ग्राहकाला सेवा मिळेपर्यंत किंवा वस्तू विकल्या जाईपर्यंत संपूर्ण साखळीत केवळ हिंदूच रहातील, हे पाहिले पाहिजे. आपली मुले आणि तरुण यांना लहानपणापासूनच प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करावी लागेल. हिंदूंचा बराच वेळ निरुपयोगी गोष्टीत जातो, जो नियोजित मार्गाने थांबवला पाहिजे. नोकरी करण्याचे निरर्थक कौतुक थांबले पाहिजे. आपल्या धार्मिक संघटनांनी अशी व्यवस्था बनवली पाहिजे, जी हिंदु तरुणांना रोजगार देण्यास साहाय्य करेल आणि जेणेकरून हिंदू त्यांच्या संघटनेशी अधिक जोडलेले रहातील.
हिंदु समाजातील अनेक वर्ग मांसाहार करतात. त्यामुळे हिंदूंनीही हा व्यवसाय करावा. कुक्कुटपालन, मत्स्यपालन, शेळीपालन इत्यादी व्यवसायांना प्रोत्साहन द्यावे. हे व्यवसाय सर्वांत लाभदायी आहेत. प्रत्येक जण शाकाहारी होईपर्यंत हे चालेल; मात्र मांसाहार सोडलाच पाहिजे. आपल्या साधू-संतांनी अशी प्रेरणा हिंदूंना द्यायला हवी, जेणेकरून त्यांची नैतिक मूल्ये वाढतील आणि ते स्वतःचे काम स्वाभिमानाने करू शकतील. हिंदु समाजाने पैशांची उधळपट्टी थांबवून हिंदु तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी काही कामाची व्यवस्था करायला हवी. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर मुसलमानांनी तेथे रहाणार्या हिंदूंच्या दुकानांतून वस्तू घेणे बंद केले होते. त्यामुळे सक्षम हिंदु स्थलांतरित झाले आणि गरीब हिंदूंचे धर्मांतर झाले. आर्थिक जिहाद ही एक गंभीर समस्या आहे. तिच्याशी लढण्यासाठी धोरण आखणे आवश्यक आहे. आपण सर्व हिंदूंनी या विषयावर जागरूक राहून त्यावर कार्य करणे अत्यंत आवश्यक आहे.’
– श्री. सचिन सिझारिया, पुणे.