सातारा येथील सैनिकाला जम्मू-काश्मीर येथे वीरमरण !
सातारा, २२ जुलै (वार्ता.) – तालुक्यातील परळी भागातील सांडवली येथील सैनिक विजय रामचंद्र कोकरे यांना जम्मू-काश्मीर येथे कर्तव्यावर असतांना वीरमरण आले आहे. या घटनेमुळे परळी भागातील सांडवली गावावर शोककळा पसरली आहे.
वर्ष २०१७ मध्ये विजय कोकरे हे सैन्यात भरती झाले. त्यांचे सर्व शिक्षण मुंबई येथे झाले. लहानपणापासून त्यांचे सैन्यात जाण्याचे स्वप्न होते. घरची परिस्थिती बेताचीच आहे. वडील खासगी वाहनचालक असून विजय यांच्या पश्चात आई-वडील आणि बहीण असा परिवार आहे. ही वार्ता समजल्यानंतर परळी भागात गावागावात भावपूर्ण श्रद्धांजलीचे फलक लावण्यात आले आहेत. विजय कोकरे यांच्या मृत्यूची वार्ता ‘आर्मी सेंटर’कडून देण्यात आली आहे.