धर्मनिरपेक्षतावादी राजकीय पक्षांचा महिलांच्या रक्षणाविषयीचा सोयीस्कर दुटप्पीपणा जाणा !
बंगालमध्ये ३ मासांपूर्वी धर्मांधाने बलात्कार करून हत्या केलेल्या हिंदु युवतीचा विवस्त्र मृतदेह पोलिसांनी फरफटत नेल्यावर राजकीय पक्षांचे होते मौन !
मणीपूरमध्ये २ महिलांवर बलात्कार करून त्यांची विवस्त्र धिंड काढल्याच्या घटनेनंतर देशभरात निषेध व्यक्त केला जात असतांना बंगालमध्ये याहून अधिक संतापजनक घटना एप्रिल २०२३ मध्ये घडली होती. २७ एप्रिलच्या ‘दैनिक सनातन प्रभात’च्या पृष्ठ १ वर ही बातमी ठळकपणे प्रकाशित करण्यात आली होती. या घटनेवर त्या वेळी भारतभरातील एकाही धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांनी अश्रू ढाळले नाहीत कि तोंडातून ‘ब्र’ काढला नाही.
(सौजन्य : Aaj Tak HD)
या घटनेमध्ये बंगालच्या दिनाजपूर येथे जावेद नावाच्या धर्मांध मुसलमानाने एका हिंदु युवतीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. यानंतर बंगाल पोलिसांनी तिचा विवस्त्र मृतदेह फरफटत नेल्याचा व्हिडिओ समोर आला होता. युवतीच्या झालेल्या शवविच्छेदन अहवालात पोलिसांनी तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचे दाखवल्याने संतप्त झालेल्या जमावाने तेथील पोलीस ठाणे जाळले होते. तेव्हा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात बर्मन आडनाव असलेल्या एका हिंदु युवकाचा मृत्यू झाला होता. मणीपूरच्या घटनेवर आज बोलणारे या घटनेच्या वेळी मौन होते.
संपादकीय भूमिकाबलात्कारी धर्मांध मुसलमान, तर पीडिता हिंदु असल्यानेच ही भयाण शांतता होती ! या ठिकाणी चुकून आरोपी हिंदु असता, तर या राजकीय पक्षांनी त्याच वेळी आकांडतांडव केला असता ! आणि पीडिता महिलांच्या रक्षणाविषयी सोयीस्कर भूमिका घेणार्या राजकीय पक्षांना आता जनतेने जाब विचारला पाहिजे ! |