देहली येथील २ मोठ्या मशिदी पाडण्याचा रेल्वे प्रशासनाचा आदेश !

रेल्वेच्या भूमीवर अतिक्रमण करून मशिदी बांधल्याची रेल्वे प्रशासनाची माहिती

नवी देहली – शहरातील बंगाली मार्केट मशीद आणि तकिया बब्बर शाह या २ मोठ्या मशिदींच्या व्यवस्थापकांना रेल्वे प्रशासनाने नोटीस पाठवली आहे. ‘या दोन्ही मशिदी १५ दिवसांत हटवा अन्यथा रेल्वेचे अधिकारी येऊन त्या पाडतील’, असे नोटिसीत म्हटले आहे. दोन्ही मशिदींच्या व्यवस्थापकांचे म्हणणे आहे की, या मशिदी शेकडो वर्षे जुन्या आहेत. रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे की, रेल्वे मंडळाच्या जागेवर अतिक्रमण करून त्या बांधण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे की, मशिदींवर रेल्वेच्या अधिनियमांप्रमाणे कारवाई करण्यात येईल. अतिक्रमण हटवण्याच्या प्रक्रियेमध्ये जी हानी होईल, त्याला मशिदींचे व्यवस्थापन मंडळ उत्तरदायी असेल.

संपादकीय भूमिका

  • रेल्वे मंडळाच्या भूमीवर मशिदी बांधण्यात येईपर्यंत रेल्वे प्रशासन झोपले होते का ? या बेकायदेशीर मशिदी पाडण्यासह त्यास उत्तरदायी रेल्वे अधिकार्‍यांवर कारवाई करा !
  • धर्मांधांचा भूमी जिहाद आटोक्यात आणण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलणे आवश्यक !