अण्वस्त्रांद्वारे आक्रमण केल्यास हुकूमशाह किम जोंग यांची राजवट संपवू !

  • उत्तर कोरियाने पिवळ्या (यलो) समुद्रात अनेक क्रूझ क्षेपणास्त्रे डागल्याचा परिणाम !

  • दक्षिण कोरियाची उत्तर कोरियाला चेतावणी !

हुकूमशाह किम जोंग उन

सेऊल (दक्षिण कोरिया) – उत्तर कोरियाने २२ जुलै या दिवशी पिवळ्या (यलो) समुद्रात अनेक क्रूझ क्षेपणास्त्रे डागल्याने उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यातील तणावात वाढ झाली. ‘उत्तर कोरियाने अण्वस्त्रांद्वारे आक्रमण केल्यास हुकूमशाह किम जोंग उन यांची राजवट संपुष्टात आणू’, अशी चेतावणी दक्षिण कोरियाने दिली आहे.

१९ जुलै या दिवशी अमेरिकेने दक्षिण कोरियाच्या बंदरात आण्विक पाणबुडी तैनात केल्यानंतर उत्तर कोरियाने क्षेपणास्त्रे डागली. उत्तर कोरियाच्या वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका आणि दक्षिण कोरिया हे आपापसांत संरक्षण सहकार्य वाढवत आहेत. त्यासाठी सैनिकी सराव केला जात आहे. त्यांना २० जुलै या दिवशी उत्तर कोरियाचे संरक्षण मंत्री कांग सन नाम यांनी धमकी दिली होती. ‘उत्तर कोरिया त्यांना अण्वस्त्रद्वारे केलेल्या आक्रमणांना प्रत्युत्तर देऊ शकतो’, असे ते म्हणाले होते.