लेबेनॉन आर्थिक संकटात, ९० टक्के जनतेकडे खाण्यासाठीही पैसे नाहीत !
बेरुट (लेबेनॉन) – श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यानंतर मध्यपूर्वेतील देश लेबेनॉनमध्येही आर्थिक संकट निर्माण झाले आहे. तेथील ९० टक्के कुटुंबांना अन्न विकत घेण्यासाठीही पैसे शिल्लक नाहीत. तेथील अर्थव्यवस्था कोलमडून गेली असून केंद्रीय बँकेचे राज्यपाल रियाद सलामेह यांनी पदावर तब्बल ३० वर्षे राहिल्यानंतर त्यागपत्र दिले आहे.
मुस्लिम देश लेबनान में भी हालात दिन-प्रतिदिन बिगड़ रहे हैं. कंगाली के मुहाने पर खड़े लेबनान के केंद्रीय बैंक के गवर्नर रियाद सलामेह 30 सालों बाद अपनी कुर्सी छोड़ रहे हैं. लेबनान में 10 में से 9 परिवारों के पास खाने-पीने का सामान खरीदने तक का पैसा नहीं बचा है. pic.twitter.com/I3hQ0nZYvi
— 🇮🇳 राधादेव शर्मा 🇮🇳 (@RADHA_83) July 22, 2023
सर्वत्र लूटमारीची स्थिती पहायला मिळत आहे. सामान्य जनता बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी जाते; परंतु त्यांना रिकाम्या हाती परतावे लागते. बँकांकडे लोकांना त्यांचे पैसे देण्यासाठीही पैसे नाहीत. यामुळे संतप्त झालेले काही लोक बँकाही लुटू लागले आहेत. अशातच तेथील एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांत मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला असून त्यामध्ये उमर आवाह नावाचा माणूस बँकेच्या एका कर्मचार्यावर दबाव आणतांना दिसत आहे. त्याच्या हातात आम्लाने भरलेली बाटली असून कर्मचार्याने पैसे दिले नाही, तर त्याच्यावर आम्ल फेकण्याची धमकी तो देत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.