चिनी भ्रमणभाष आस्थपानांनी बुडवला ८ सहस्र कोटी रुपयांचा कर !
ओप्पो, विवो, शाओमी आणि ट्रान्सेशन यांसारख्या मोठ्या आस्थापनांचा समावेश !
नवी देहली – केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात माहिती देतांना सांगितले की, भ्रमणभाष संचांची निर्मिती करणार्या चिनी आस्थापनांनी गेल्या ५ वर्षांत ८ सहस्र कोटी रुपयांचा सीमा शुल्क आणि वस्तू अन् सेवा कर बुडवला आहे. या आस्थापनांनमध्ये ओप्पो, विवो, शाओमी आणि ट्रान्सेशन यांसारख्या मोठ्या आस्थापनांचा समावेश आहे. भारतातील चिनी भ्रमणभाष आस्थापनांची वार्षिक उलाढाल दीड लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.
चीन की मोबाइल कंपनियां भारत में टैक्स चोरी कर रहीं: 5 साल में कस्टम से लेकर GST जैसे 8000 करोड़ रुपए की टैक्स चोरी की, ओप्पो ने 5,086 करोड़ का टैक्स चुराया#China #Tax https://t.co/SndsvowHBv
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) July 22, 2023
मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार वर्ष २०१७ ते २०२३ या कालावधीत चिनी आस्थापनांनी ७ सहस्र ९६५ कोटी रुपयांचा सीमा शुल्क बुडवला. त्यांच्याकडून आतापर्यंत केवळ ६०४ कोटी वसूल करण्यात आले आहेत. याप्रकरणी त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. वस्तू आणि सेवा कर चोरीच्या प्रकरणात ही रक्कम १ सहस्र १०८ कोटी रुपये होती. त्यांपैकी १ सहस्र २६ कोटी रुपये वसूल झाले आहेत.
संपादकीय भूमिकाकर बुडवणार्या अशा भारतद्रोही चिनी भ्रमणभाष आस्थापनांवर भारतियांनी बहिष्कार घालून त्यांचे भ्रमणभाष संच खरेदी करण्याचे टाळले, तर या आस्थापनांना धडा मिळेल, असे कुणाला वाटल्यास चुकीचे काय ? |