राज्यातील दरडप्रवण क्षेत्रातील घरे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणार !
मुंबई, २१ जुलै (वार्ता.) – राज्यातील दरडप्रवण क्षेत्रातील घरे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार आहेत. २१ जुलै या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीत याविषयी निर्णय घेण्यात आला. याविषयी आराखडा सिद्ध करण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. इरशाळवाडी येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने हा निर्णय घेतला आहे. विधानसभेत आमदार महेश बालदी यांनी रायगड येथील अन्य धोकादायक वाड्यांविषयीचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. याविषयी रायगड येथील कर्नाळा गडाजवळील घेरावाडी, तसेच डोंगर कपार्यात वसलेल्या ५ वाड्यांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार आहे. आदिवासी विकासमंत्र्यांना याविषयीची सूचना देण्यात आली.