राजू यादव यांच्याकडून उंचगाव परिसरातील १०० ज्येष्ठ आणि गरजू नागरिकांना छत्री वाटप !
उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) – सातत्याने सामाजिक उपक्रम घेणारे ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांच्या पुढाकाराने उंचगाव परिसरातील १०० ज्येष्ठ नागरिक आणि गरजू यांना छत्री वाटप करण्यात आले. पावसाळ्यात देण्यात आलेल्या या छत्र्यांविषयी नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या प्रसंगी जिल्हाप्रमुख श्री. संजय पवार आणि श्री. विजय देवणे, शहरप्रमुख श्री. रवीकिरण इंगवले यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद माळी, उंचगावचे उपसरपंच विराग करी, सर्वश्री दीपक रेडेकर, दीपक पाटील, विक्रम चौगुले, संतोष चौगुले यांसह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांनी युवा पिढीस धर्माचरण शिकवून सुसंस्कृत पिढी घडवावी.