पुणे येथे चित्रपटगृहात महिलेशी अश्लील वर्तन करणार्या २ धर्मांधांसह एकाला अटक !
पुणे – ‘मगरपट्टा सिटी’तील चित्रपटगृहात महिलेशी अश्लील वर्तन करणार्या तिघांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. महिलेच्या पतीने तिघांना खडसावले. तेव्हा आरोपींनी पतीला शिवीगाळ करून धमकावले. या प्रकरणी महिलेच्या पतीने पोलिसांकडे तक्रार दिली असून पसार झालेले महंमद आदिल, अफजल अली आणि अन्य एकाला अटक करण्यात आली आहे. (धर्मांधांचा उद्दामपणा दिवसेंदिवस वाढतच आहे. यासाठी महिलांना स्वरक्षणाचे धडे देणे आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणे, असे केल्यासच कायदा-सुव्यवस्था राखली जाऊ शकते. – संपादक)