पाकच्या ‘आय.एस्.आय.’शी संबंध असणारे ३ जण अटकेत !
आतंकवादविरोधी पथकाची कारवाई
मुंबई – महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश यांच्या आतंकवादविरोधी पथकांनी पाकच्या ‘आय.एस्.आय.’ या गुप्तचर संस्थेशी संबंध असल्याच्या आरोपाखाली महंमद रईस, सय्यद अरमान (वय ६५ वर्षे) आणि महंमद सलमान सिद्दीकी (वय २५ वर्षे) यांना जोगेश्वरी येथून अटक केली.
१. अरमान हा पाकमधील त्याचा भाचा सय्यद मद्दसर हुसेन याच्या माध्यमातून आय.एस्.आय.च्या संपर्कात होता.
२. अरमानकडे उत्तरप्रदेशातील सैन्याविषयीची महत्त्वपूर्ण माहिती आणि छायाचित्रे मिळाली. त्यातून समजले की, सय्यद मद्दसर हुसेन याला ‘मुन्ना झिंगाडा’ नावाने ओळखले जात होते. झिंगाडा हा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याही संपर्कात आहे.
३. झिंगाडा याने अरमान आणि महंमद रईस या दोघांना उत्तरप्रदेशात आतंकवादी कारवायांसाठी नियुक्त केल्याचे समजते. झिंगाडा हा अरमानला ‘आय.एस्.आय.’मध्ये तरुणांची भरती करण्यासाठी बर्याच वेळेला पैसे द्यायचा.
४. अरमानने त्याला लवकर पैसे मिळण्यासाठी झिंगाडाशी जोडून दिले होते. अरमान हा रईसला त्याच्या वाटणीचेे पैसे पाठवण्यासाठी सिद्दिकीची नियुक्त करणार होता.
५. झिंगाडा याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. वर्ष २००० मध्ये बँकॉक येथे छोटा राजनशी संबंधित गोळीबाराच्या एका घटनेनंतर झिंगाडाला प्रसिद्धी मिळाली. तेथील पोलिसांनी पकडले, तरीही तो खोटी ओळख दाखवून फिरत होता; परंतु खरी ओळख न कळल्याने वर्ष २०१९ मध्ये त्याला पाकमध्ये पाठवण्यात आले.
संपादकीय भूमिका :आतंकवाद रोखण्यासाठी सरकारने आतंकवाद्यांना जरब बसेल, अशी कारवाई करणे आवश्यक आहे ! |