(म्हणे) ‘माणसांचे दु:ख पाहिले, तर आमच्या हृदयालाही दु:ख होते !’ – भारतातील अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी
मणीपूर हिंसाचारावरून अमेरिकी राजदूत पुन्हा बरळले !
नवी देहली – मणीपूरमध्ये दोन महिलांना निर्वस्त्र करून त्यांची धिंड काढल्याच्या प्रकरणी भारतातील अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी पुन्हा एकदा बरळले. ते म्हणाले की, मणीपूरमधील हिंसाचार हे भारताचे अंतर्गत प्रकरण आहे. असे असले, तरी माणसांचे दु:ख पाहिले, तर आमच्या हृदयालाही दु:ख होते.
मणिपुर घटना पर क्या अमेरिका का बयान, पढ़िए इस ख़बर में…#ManipurViolence #ManipurViralVideo https://t.co/aAGc9UPJmh
— AajTak (@aajtak) July 21, 2023
गार्सेटी पुढे म्हणाले की, या घटनेचा व्हिडिओ मी पाहिलेला नाही. मी प्रथमच याविषयी ऐकत आहे. मी याआधीही म्हटले होते की, जेव्हा मानवीय दु:ख होते, तेव्हा आम्हालाही दु:ख होते.
संपादकीय भूमिका
|