बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी चाकू घेऊन घुसणार्या नूर आलम याला अटक !
कोलकाता (बंगाल) – बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी चाकू आणि अन्य प्राणघातक शस्त्रे घेऊन घुसण्याचा प्रयत्न करणारा नूर आलम या तरुणाला पोलिसांनी अटक केलीे. या तरुणाकडे विविध अन्वेषण यंत्रणांची ओळखपत्रेही सापडली असून त्याच्या चारचाकी गाडीवर ‘पोलीस’ असे स्टिकरही लावलेले होते. (जर असे करून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोचणे शक्य असेल, तर पोलीस कशी सुरक्षा ठेवत असतील ?, याची कल्पना करता येते ! – संपादक) याच गाडीने नूर आलम मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत पोचला होता. नूर आलम याने हे कृत्य का केले ?, हे अद्याप समजू शकलेले नाही.
ममता बनर्जी के घर की गली में घुसते पकड़ा गया नूर आलम, पुलिस की स्टीकर लगी गाड़ी में था सवार: चाकू-बंदूक भी मिले#MamtaBanerjee #Kolkatapolice https://t.co/VSeDlkiLqg
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 21, 2023
संपादकीय भूमिकाममता बॅनर्जी यांचे सरकार मुसलमानांसाठी सर्व काही करत असतांना मुसलमान असे कृत्य का करत आहेत ? याचा विचार सरकारने करणे आवश्यक आहे ! |