अमित शहा आणि डॉ. जयशंकर ‘शीख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेच्या निशाण्यावर !
माहिती देणार्यांना १ कोटी रुपयांचे बक्षीस देऊ ! – आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू
नवी देहली – ‘शीख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख आणि भारताने ‘फरार’ घोषित केलेला आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याने भारताला धमकी दिली आहे. तो म्हणाला की, कॅनडामध्ये मारला गेलेला खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येला परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि कॅनडातील भारताचे उच्चायुक्त संजय वर्मा हे उत्तरदायी आहेत. या तिघांचीही माहिती देणार्याला १ लाख २५ सहस्र डॉलरचे (जवळपास १ कोटी रुपयांचे) बक्षिस दिले जाईल. हे तिघेही आमचे लक्ष्य आहेत. शीख शस्त्र चालवणे विसरलेले नाहीत. आता प्रत्येक गोळीला गोळीनेच प्रत्युत्तर दिले जाईल, अशी धमकीही पन्नू याने दिली.
अमित शाह और एस जयशंकर के दौरे की जानकारी देने पर खालिस्तानी आतंकी पन्नू ने रखा इनाम, जारी हुआ अलर्ट#AmitShah #Khalistan #Sjaishankarhttps://t.co/B0tKWeBoqz
— ABP News (@ABPNews) July 21, 2023
जयशंकर, शहा आणि वर्मा यांच्या छायाचित्रांचे एक भित्तीपत्रक प्रसारित करून त्यावर ‘वॉन्टेड’ असे लिहिण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकागुरपतवंत सिंह पन्नू याच्यासारख्या खलिस्तान्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी भारत सिद्ध असून अशा धमक्यांना तो कोणतीही भीक घालत नाही ! |