वर्ष २०२३ च्या अखेरीस देशातील मुसलमानांची लोकसंख्या अनुमाने २० कोटी होईल ! – मंत्री स्मृती इराणी
नवी देहली – वर्ष २०२३ च्या अखेरीस देशातील मुसलमानांची लोकसंख्या अनुमाने २० कोटी होईल, असे केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितले. तृणमूल काँग्रेसच्या खासदार माला रॉय यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. मार्च २०१४ पासून आतापर्यंत ५०.२ टक्के मुसलमान कुटुंबांनी प्रथमच नवीन घर किंवा फ्लॅट विकत घेतला आहे, अशीही माहिती स्मृती इराणी यांनी दिली.
देश में 2023 में कितनी हो गई है मुस्लिमों की आबादी? सरकार ने संसद में बताया, जानें लेटेस्ट आंकड़ा..https://t.co/yMjoumyZO1 pic.twitter.com/H8qDFG96Vc
— जनगण न्यूज (@jangannewss) July 21, 2023
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, वर्ष २०११च्या जनगणनेनुसार भारतात मुसलमानांची संख्या १७ कोटी २० लाख इतकी होती. हा आकडा देशाच्या एकूण लोकसंख्येच्या १४.२ टक्के इतका होता.