आम्हाला कुठल्याही परिस्थितीत मंदिर तेथेच बांधून हवे ! – पाकमधील हिंदूंची रोखठोक भूमिका
कराची येथील श्री मारीमाता मंदिर पाडल्याचे प्रकरण
कराची (पाकिस्तान) – पाक सरकारने येथील १५० वर्षे जुने श्री मारीमाता मंदिर १४ जुलै २०२३ या दिवशी पाडून टाकले. त्या ठिकाणी व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे. मंदिर पाडल्यानंतर तेथे रहाणार्या हिंदूंनी सरकारचा निषेध केला आहे. ‘आम्हाला कुठल्याही परिस्थितीत मंदिर बांधून हवे आहे, अशी रोखठोक भूमिका हिंदूंनी सरकारसमोर मांडली आहे.
सौजन्य: Real entertainment tv
या मंदिरात पूजा करण्याची अनुमती नाकारण्यात आली होती, तसेच मंदिरातील मूर्तीही चोरीला गेल्या होत्या, असे हिंदु महिलांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले. या मंदिराच्या प्रांगणात जुना खजिनाही पुरला आहे.
संपादकीय भूमिकापाकमधील पीडित हिंदूंच्या मागणीला भारत सरकारने पाठिंबा देऊन पाक सरकारला मंदिर त्याच जागी बांधून देण्यास भाग पाडले पाहिजे ! |