‘ईडी’ने साई रिसॉर्टला ठोकले टाळे !
मुरुड येथील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरण
दापोली – ईडीने (अंमलबजावणी संचालनालयाने) तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्टला १९ जुलै या दिवशी टाळे ठोकले. शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) माजी मंत्री अनिल परब आणि सदानंद कदम यांच्याशी संबंधित साई रिसॉर्टच्या बांधकामात ‘सी.आर्.झेड.’ कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ‘मनी लाँड्रिंग’ झाल्याचाही संशय आहे.
जानेवारी २०२३ मध्ये ईडीने या प्रकरणात आरोपपत्र प्रविष्ट केले आहे; मात्र अनिल परब यांना आरोपी करण्यात आलेले नाही. या प्रकरणी सदानंद कदम आणि अधिकारी जयराम देशपांडे यांच्यावर आरोप ठेवण्यात आले होते. अनिल परब यांची साई रिसॉर्टच्या संदर्भात गेल्या काही महिन्यांत ईडीने अनेक वेळा चौकशी केली होती.