खापरखेडा औष्‍णिक वीज केंद्र (नागपूर) येथील राखेचा बंधारा फुटल्‍याने शेतात चिखल !

प्रतिकात्मक चित्र

नागपूर – जिल्‍ह्यातील खापरखेडा औष्‍णिक वीज केंद्राचा राखेचा बंधारा फुटल्‍यामुळे परिसरातील शेतकर्‍यांची मोठी हानी झाली आहे. बंधार्‍यातून बाहेर निघालेली राख आणि चिखल अनेक शेतकर्‍यांच्‍या शेतात पसरला आहे. त्‍यामुळे नुकतीच पेरणी केलेल्‍या शेतकर्‍यांचीही पुष्‍कळ आर्थिक हानी झाली आहे.

खापरखेडा औष्‍णिक वीज केंद्रामधून निघणारी राख जवळच्‍या वारेगाव येथील राखेच्‍या बंधार्‍यात साठवली जाते. १ सहस्र एकरपेक्षा जास्‍त क्षेत्रात पसरलेला राखेचा हा बंधारा पूर्ण भरला आहे. बंधार्‍यातून राखमिश्रित चिखलयुक्‍त पाणी बाहेर पडून बंधार्‍याला गळती लागली. महानिर्मितीकडून दुरुस्‍ती चालू करण्‍यात आली; पण त्‍यास विलंब होत असल्‍याने बंधारा फुटला. त्‍यामुळे वरील प्रकार घडला.

काठोकाठ भरलेला राखेचा बंधारा उन्‍हाळ्‍याच्‍या दिवसांत का रिकामा केली नाही ?’, असा प्रश्‍न गावकर्‍यांनी विचारला आहे. महानिर्मितीने बंधारात भेग पडलेल्‍या ठिकाणी दुरुस्‍तीचे काम चालू केले असून ‘लवकरच बंधार्‍यातून होणारी गळती थांबवली जाईल’, अशी माहिती दिली आहे.

संपादकीय भूमिका :

  • प्रशासन पावसाळ्‍यापूर्वी सर्व बंधार्‍यांची पहाणी करत नाही का ?
  • शेतकर्‍यांच्‍या आरोग्‍यावर याचा परिणाम झाल्‍यास त्‍याला उत्तरदायी कोण ?