नागपूर येथे झालेल्या ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’च्या वेळी समाजातून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि साधकांनी अनुभवलेली गुरुकृपा !
नागपूर येथे २१.१२.२०२२ या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ आणि आध्यात्मिक संघटना, तसेच ज्ञाती संस्था यांच्यासह अनेक जण ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’मध्ये सहभागी झाले होते. या मोर्चाचे नियोजन, प्रचार आणि प्रत्यक्ष मोर्चा यांमध्ये सेवा करतांना सनातनच्या साधकांना समाजातून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद, जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
(भाग १)
१. ‘विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत ‘धरणे आंदोलन’ करणे आणि विधानसभेवर मोर्चा काढणे’, यांचा उद्देश
‘लव्ह जिहाद’चे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच ‘एका धर्मांधाने श्रद्धा वालकर या तरुणीचे ३५ तुकडे करून शीतकपाटात ठेवले’, ही बातमी देशभर पसरली आणि ‘लव्ह जिहाद’विरुद्ध कायदा व्हावा’, अशी मागणी देशभरात जोर धरू लागली. त्याच वेळी ‘नागपूर येथे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन होणार’, हे निश्चित झाले. ‘महाराष्ट्र शासनाने या ज्वलंत प्रश्नांवर, म्हणजे ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ यांच्या विरोधात कायदा करावा’, यासाठी समाजाला जागृत करावे’, या हेतूने अधिवेशनकाळात विधानसभेवर मोर्चा काढायचे निश्चित झाले. ‘मोर्चाचे स्वरूप राज्यस्तरीय ठेवूया’, असाही निर्णय घेण्यात आला आणि मोर्चापूर्वी धरणे आंदोलन करण्यात आले.
२. नागपूर शहरात मोर्चाच्या प्रचाराला उदंड प्रतिसाद मिळणे
त्यानंतर प्रत्यक्ष मोर्चाच्या प्रचाराला आरंभ केला. विदर्भातील सगळ्या जिल्ह्यांतील प्रत्येक साधकाने समाजात जाऊन ५० व्यक्तींना निमंत्रण देण्याचे ठरले. त्याप्रमाणे नागपूरमध्ये प्रचाराचे कार्य चालू झाले. जसजसा मोचार्र्चा दिवस समीप येत होता, तसतशी प्रचाराला गती येत गेली. हस्तपत्रके छापणे, ऑटो रिक्शावर ‘फ्लेक्स’ लावणे, मोठ्या ‘होर्डिंग’साठी प्रायोजक मिळवून ते शहरातील मुख्य ठिकाणी लावणे इत्यादी सेवा करतांना नागपूर शहरात उदंड प्रतिसाद मिळाला आणि सर्वांनी ‘आम्ही मोर्च्यात सहभागी होऊ. समवेत सहकार्यांनाही आणू’, असा अभिप्राय दिला.
३. मोर्चाच्या पूर्वी प्रचाराची सेवा करतांना साधकांना आलेल्या अनुभूती !
३ अ. भित्तीपत्रके लावण्याची सेवा करतांना एका रिक्शावाल्या दादांनी पैसे न घेता त्यांच्या रिक्शातून सेवेच्या ठिकाणी सोडणे :‘एका ठिकाणची भित्तीपत्रके (पोस्टर्स) लावण्याची सेवा झाल्यावर आम्हाला दुसरीकडे जायचे होते. मला दम्याचा त्रास आहे, तसेच माझा एक पाय पुष्कळ दुखतो. ‘आम्हाला पुढे जायचे आहे’, हे ओळखून एका रिक्शावाल्या दादांनी आम्हाला स्वतः त्या ठिकाणी नेले. त्यांना ‘किती पैसे झाले ?’, असे विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘तुम्ही चांगले काम करत आहात. पैसे नको. आम्ही मोर्च्यात अवश्य येऊ.’’
– एक साधिका
३ आ. उपाहारगृहवाल्यांनी सेवा करणार्या साधकांना चहा आणि अल्पाहार देणे : ‘भित्तीपत्रके लावणे आणि प्रसारसेवा करणे’, या सेवा करतांना कुणी उपाहारगृहवाले चहा घेण्यासाठी आग्रह करत होते, तर कुणी म्हणायचे, ‘‘तुम्ही बर्याच वेळापासून उभ्या आहात. थोडे खाऊन घ्या.’’ ‘या माध्यमातून गुरुमाऊलीच आमची काळजी घेत आहे’, असे मला जाणवत होते.’
– सौ. जयश्री अशोक देशपांडे (वय ७१ वर्षे), सौ. विजया बरडे (वय ६८ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सौ. नमिता काकडेे, श्रीमती सुषमा पराते, श्रीमती सुषमा बत्रा आणि श्रीमती कल्पना अर्वेनला (वय ६० वर्षे)
३ इ. ‘प्रसारात काय बोलावे ?’, हे माझ्या लक्षात येत नव्हते; पण गुरुदेवांनी माझ्याकडून योग्य तिथे योग्य ते बोलून घेतले.’ – श्रीमती शांता कोरान्ने (वय ७४ वर्षे)
३ ई. प.पू. गुरुदेवांना शरणागतभावाने प्रार्थना केल्यावर साधकांच्या निवासासाठी जागा मिळणे : ‘मोर्चा आणि हिवाळी अधिवेशन या २ मोठ्या समष्टी सेवा नागपूर जिल्ह्यातील साधकांना मिळाल्या. तेव्हा आम्हाला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. साधकांची रहाण्याची व्यवस्था करायची होती. पुष्कळ शोधूनही काही व्यवस्था होत नव्हती. त्या वेळी आम्ही प.पू. गुरुदेवांना शरणागतभावाने प्रार्थना केल्यावर निवासासाठी ५ जागा योग्य ठिकाणी मिळाल्या.’
– सौ. नम्रता विनय शास्त्री (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के, वय ७१ वर्षे), सौ. नमिता काकडे (वय ६१ वर्षे) आणि श्रीमती शैलजा लोथे (वय ७३ वर्षे)
३ उ. शारीरिक त्रासामुळे प्रसारसेवेसाठी बाहेर जाता न येणे, घरी राहून संपर्काची सेवा करणे आणि त्या वेळी शारीरिक त्रासाचा विसर पडणे : ‘शारीरिक त्रासामुळे प्रसारसेवेसाठी आम्ही बाहेर जाऊ शकलो नाही, तरीही आमचे मन स्थिर होते. घरात राहून आमच्याकडून अधिकाधिक संपर्क सेवा होत होती. ‘अधिकाधिक लोक मोचार्र्ला यावेत’, यासाठी आमच्याकडून प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त होत होती. आम्हाला शारीरिक त्रासाचा विसर पडला होता.’ – श्रीमती शैलजा लोथेे आणि श्रीमती चित्रा खटी (वय ७१ वर्षे)
३ ऊ. प्रतिकूल परिस्थितीत स्थिर राहून तळमळीने सेवा करणार्या सौ. काकडे ! : ‘एका दुर्घटनेत माझी सख्खी बहीण ८० टक्के भाजली. त्या स्थितीतही स्थिर राहून माझ्याकडून गुरुदेवांनी सेवा करून घेतली. ‘संत आणि साधक यांच्यासाठी जेवणाचा डबा पाठवणे, साधकांना रहाण्यासाठी लागणारे साहित्य आणणे’, या सेवा मला मिळाल्या होत्या.’
– सौ. नमिता काकडे
३ ए. आरंभी मोर्चाला जायला यजमानांकडून अनुमती न मिळणे आणि गुरुकृपेने मोर्चाच्या दिवशी त्यांनी अनुमती देणे
१. ‘मोर्चाला जाण्यासाठी मला घरून अनुमती नव्हती. ही परिस्थिती मी स्थिर राहून स्वीकारली; परंतु मोचार्र्ला जात येत नसल्याने मला खंत वाटत होती. ‘आपण नाही, तर इतरांना तरी मोर्चात जाण्यास प्रेरित करू’, असा ध्यास मला लागला होता. त्यानुसार भ्रमणभाषद्वारे माझी संपर्काची सेवा चालू होती. शेवटी गुरुकृपेने मोर्चाच्या आदल्या दिवशी यजमानांनी स्वतःच मला मोचार्र्ला जाण्यास सांगितले. त्या वेळी मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. हे पालट केवळ गुरुदेवच करू शकतात. याबद्दल कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरीही ती अत्यल्पच आहे.’
– एक गुरुसेविका
२. ‘मोर्चात जायला मिळावे; म्हणून माझ्याकडून गुरुदेवांना सतत प्रार्थना होत होत्या. मोर्चात जाण्यासाठी यजमानांनी नकार दिला; परंतु लहान मुलीच्या सांगण्यावरून त्यांनी वेळेची अट घालून मला जाण्यास अनुमती दिली.’
(क्रमशः)
– एक गुरुसेविका (२९.१२.२०२२)
मोर्चाची फलनिष्पत्ती‘मोर्चाच्या दिवशी ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ यांच्या विरोधातील कायद्याविषयी शासन विचार करील’, असे शासनाकडून आश्वासन मिळणेप्रत्यक्ष मोर्चाच्या दिवशी साधारण २ सहस्र ५०० व्यक्ती या मोर्च्यात सहभागी झाल्या. शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा ‘यशवंत स्टेडियम’पासून निघून विधानसभेवर पोचला. त्या ठिकाणी काही मान्यवरांनी व्याख्याने दिली. ५ आमदार या मोर्च्याला संबोधित करण्यासाठी व्यासपिठावर आले होते. मोर्च्याची सांगता झाल्यावर नेतृत्व करणार्या मोर्चेकर्यांना प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांनी भेटीची अनुमती दिली, तसेच ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ यांच्या विरोधातील कायद्याविषयी शासन विचार करील’, असे आश्वासनही दिले. हीच या मोर्च्याची फलनिष्पत्ती होती. |
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/703632.html