कोपरगावात अवैध कार्य करणार्या मदरशावर बुलडोजर चालवावा लागेल ! – सुरेश चव्हाणके, संपादक, सुदर्शन वाहिनी
लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या विरोधात कोपरगाव (अहिल्यानगर) येथे जनआक्रोश मोर्चा
कोपरगाव (जिल्हा अहिल्यानगर) – कोपरगावात अंबिकानगर येथे अवैध मशीद उभी रहात आहे. ती त्वरित हटवा, अन्यथा आम्हाला पुढाकार घ्यावा लागेल. कोपरगाव शहरात मालेगाव, भिवंडी येथून मुसलमान आणले आहेत. हे कमी कि काय म्हणून बांगलादेशीही आणले आहेत; पण हे थांबवावे लागेल. ज्या मदरशात मुलीवर अत्याचार झाला, ती उभी कशी ? अवैध कार्य करणार्या मदरशावर बुलडोजर चालवावा लागेल. तसेच शहरातील मशिदीवरील भोंगे त्वरित बंद करावेत; अन्यथा आम्ही त्यांच्या समोर हिंदु घरांवर दुसरे भोंगे लावू, अशी चेतावणी ‘सुदर्शन’ वाहिनीचे संचालक सुरेश चव्हाणके यांनी कोपरगाव येथील हिंदु जनआक्रोश मोर्चामध्ये दिली. २० जुलैला सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोर ते बोलत होते. सकल हिंदु समाजाच्या वतीने हिंदु महिला आणि मुली यांच्यावरील वाढते अत्याचाराचे प्रमाण, लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या विरोधात कोपरगावात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला शहरासह १२५ गावे बंद ठेवून पाठिंबा देण्यात आला. या वेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल, सागर बेग, अर्चना ठाकूर, सेनेचे शहर प्रमुख सनी वाघ आदींसह अनुमाने ५० सहस्रांंहून अधिक नागरिक, महिला उपस्थित होते.
हिंदू जन आक्रोश मोर्चा मे लाखो की संख्या मे एकत्रित हुआ हिंदू जनसागर 🚩 महाराष्ट्र कोपरगाव, महाराष्ट्र में आज। #HinduHunkarSabha #HinduJanAkroshMorcha
pic.twitter.com/uvdBMtjJgS— Suresh Chavhanke “Sudarshan News” (@SureshChavhanke) July 20, 2023
ते पुढे म्हणाले की, जिहादींनी नगर जिल्ह्यास विळखा घातला आहे. अनेक व्यवसाय मुसलमानांनी कह्यात घेतले आहेत. त्यामुळे स्थानिक उपेक्षित झाले आहे. भ्रमणभाष दुकाने कह्यात घेऊन जिहादी हिंदु मुलींना फितवत आहेत.
कोपरगाव (अहिल्यानगर) येथील युवती अत्याचार प्रकरणी पसार आरोपी मौलवीला अटक
येथील युवती अत्याचार आणि धर्मांतरप्रकरणी इंदूर येथील पसार आरोपी मौलवी महंमद शोएब साजिद याला पोलिसांनी अटक केली आहे. मौलवीला न्यायालयात हजर केले असता ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ४ आरोपींना पकडले असून १ आरोपी अजूनही पसार आहे.