बहिष्कार आणि जागृती यांद्वारे हलाल प्रमाणपत्राला विरोध करता येईल ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती
भिलवाडा (राजस्थान) ‘श्री नगर माहेश्वरी सभे’च्या कार्यकारिणीच्या बैठकीत हलाल प्रमाणपत्राविषयी प्रबोधन !
भिलवाडा – सध्या ‘लव्ह जिहाद’ या समस्येने रौद्ररुप धारण केले आहे. ‘लव्ह जिहाद’ नंतर आता ‘हलाल (हलाल म्हणजे इस्लामनुसार जे वैध आहे ते) प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून ‘हलाल जिहाद’ची समस्या वाढत आहे. धर्मनिरपेक्ष देशात ‘जमियत उलेमा ए हिंद’सारख्या संघटना हलाल प्रमाणपत्रे वाटत आहेत. या प्रमाणपत्राद्वारे मिळणारा निधी आतंकवादी कारवाया करणार्या धर्मांधांना कायदेविषयक साहाय्य करण्यासाठी देण्याचा प्रयत्न होत आहे. या राष्ट्रविरोधी प्रमाणपत्रावर बहिष्कार टाकून त्याविषयी जागृती निर्माण करत त्याचा विरोध केला पाहिजे. अन्यथा भविष्यकाळात हलाल प्रमाणपत्राच्या निमित्ताने आपल्यावर इस्लामिक विचार लादून आपल्यावर बंधने घातली जातील, असे उद़्गार हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी काढले. येथील श्री नगर माहेश्वरी सभा, भिलवाडा यांच्या कार्यकारिणीच्या बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. या वेळी १५० हून अधिक पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. आनंद जाखोटिया यांनी या षड्यंत्राविषयी विस्तृत माहिती देऊन याविषयी सरकारला पत्र लिहिण्याविषयीचे आवाहन व्यापारी संघटनांना केले. श्री नगर माहेश्वरी सभेचे जिल्हाध्यक्ष श्री. अतुल राठी आणि भिलवाडा नगराध्यक्ष श्री. केदार गगरानी यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला.