लक्ष्मी अप्रसन्न होण्याची कारणे
१. कमळाचे फूल, बेलाची पाने ओलांडल्याने अथवा पायाखाली तुडवल्याने लक्ष्मी रुष्ट होऊन निघून जाते.
२. जो निर्वस्त्र होऊन स्नान करतो, नदी-तलावाच्या पाण्यात मल-मूत्राचे विसर्जन करतो, त्याला लक्ष्मी आपल्या शत्रूच्या, अर्थात् कर्जाच्या हवाली करते (कर्जबाजारी करते).
३. जो भूमीवर अथवा घराच्या भिंतींवर अनावश्यक लिहितो, कुत्सित अन्न खातो, त्याच्यावरही लक्ष्मी कृपा करत नाही.
४. जो पायांनी पाय रगडून धुतो, अतिथींचा सन्मान करत नाही, याचकांचा अनादर करतो; पशू-पक्ष्यांना चारा, दाणे वगैरे देत नाही, गायीवर प्रहार करतो, अशा मनुष्यालाही लक्ष्मी लगेच सोडून जाते.
५. जो संध्येच्या वेळी घरात, आस्थापनात झाडू मारतो, जो सकाळी आणि संध्याकाळी ईश्वराची आराधना करत नाही, जो तुळशीच्या रोपाची उपेक्षा, अनादर करतो, त्याला लक्ष्मी त्याच्या दुर्दैवाच्या हाती सोपवून देते.’
(साभार : मासिक ‘ऋषि प्रसाद’, जून २०१९)