समष्टी भक्ती पाहिली केवळ श्रीसत्शक्तीची ।
लीला भगवंताची अपार ।
नानाविध भक्तांकरवी
उलगडे भक्तीचे सार ।
पहा या कलियुगी
भक्ती किती थोर ।
सनातन कुळ उद्धरण्या
आहे जी (टीप १) तत्पर ॥ १ ॥
सख्यभक्ती ऐकली
कृष्ण-सुदाम्याची ।
विरहभक्ती ऐकली कृष्ण-मीरेची ।
मधुराभक्ती ऐकली राधा-कृष्णाची ।
समष्टी भक्ती पाहिली केवळ श्रीसत्शक्तीची ॥ २ ॥
धर्मसंस्थापनेचा गोवर्धन ।
जिच्या करकमळी देती जनार्दन ।
सद़्गुरु आणि संत लावती त्याला काठी ।
साधक उद्धरण्या सच्चिदानंद परब्रह्माची (टीप २)
कृपा किती मोठी ॥ ३ ॥
गुरुकार्यासाठी दिवस-रात्र जी एक करी ।
साधक-भक्तांवर तितकेच प्रेम करी ।
चिंता सर्वांची हरे जी माता ।
तुझे गगनसम विशाल हृदय साधकजनांचा त्राता ॥ ४ ॥
तुझ्या दर्शनाने
मनास लाभत असे शांती ।
तुझ्या वाणीने
जागृत होत असे भक्ती ।
तुझ्या मार्गदर्शनाने
मिळे दिशा उत्थानाची ।
तुझ्या कृपेने मिळत असे
साधनेस गती ॥ ५ ॥
तुझे प्रेम असे की,
न मोकळे व्हावे ।
तुझे प्रेम असे की, चिंता हरावी ।
तुझे प्रेम असे की, प्रेरणा मिळावी ।
तुझे प्रेम असे की, कृतज्ञता वृद्धींगत व्हावी ॥ ६ ॥
श्री गुरूंची तू साक्षात् सावली ।
आमचा आधारवड तू माऊली ।
आमच्या उन्नतीचा मार्ग सुकर करी ।
म्हणून हे कृतज्ञतापुष्प अर्पण करितो तुझ्या चरणी ॥ ७ ॥
टीप १ – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
टीप २ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले’
– श्री. आनंद जाखोटिया (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), उज्जैन, मध्यप्रदेश. (२४.९.२०२२)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |