स्वतःच्या अंतरातील गुरुपादुकांचे दर्शन घेतांना सौ. सानिका सिंह यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या मार्गदर्शनानुसार स्वतःच्या अंतरातील गुरुपादुकांचे दर्शन घेतांना वाराणसी येथील सौ. सानिका सिंह यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या सोहळ्याच्या आधी सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केलेले मार्गदर्शन
१ अ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पादुका आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ’ साधकांच्या हृदयमंदिरात विराजमान आहेत : ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या सोहळ्याच्या आधी एका सत्संगात सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सांगितले, ‘‘या वर्षी गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आपल्या देहरूपी मंदिरात असलेल्या हृदयातील गर्भगृहात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पादुका आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ विराजमान झाले आहेत.
१ आ. साधकांना हृदयमंदिरात तीन महागुरूंचे (परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे) दर्शन घ्यायचे असेल, तर साधकांना स्वभावदोष आणि अहं न्यून करावे लागतील ! : पूर्वी मला वाटत होते, ‘आपण गुरुदेवांना आपल्या हृदयात बोलवूया’; पण आता हे तिन्ही महागुरु (परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ) आपल्या हृदयामध्येच विराजमान झाले आहेत; मात्र आपल्याला त्यांचे दर्शन घ्यायचे असेल, तर आपल्याला स्वभावदोष आणि अहं न्यून करून अन् स्वत:कडे न्यूनता घेऊन आपल्या हृदयमंदिरात प्रवेश करावा लागेल.’’
२. स्वतःमधील अहंमुळे स्वतःच्या हृदयमंदिरात असलेल्या श्री गुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी स्वत:च्या हृदयात प्रवेश करता न येणे आणि अहं-निर्मूलन न केल्याचा पश्चात्ताप होणे
सद़्गुरु पिंगळेकाकांनी सांगितल्यानुसार मी अधून-मधून प्रयत्न करत होते. काही दिवसांपूर्वी माझ्या हृदयमंदिरामध्ये सनातनच्या तिन्ही महागुरूंचे दर्शन घेण्याचा प्रयत्न करतांना मी माझ्या हृदयमंदिरात प्रवेश करू शकत नव्हते. तेव्हा मला सद़्गुरु काकांनी सांगितलेल्या वाक्याचे स्मरण झाले. ‘मी स्वभावदोषांमुळे माझी प्रतिमा एवढी मोठी करून ठेवली आहे की, ‘मी माझ्याच हृदयात प्रवेश करू शकत नाही.’ ‘मला गुरुपादुकांचे दर्शन होऊ शकले नाही’, याचा पश्चात्ताप झाला.
३. ध्यानात दिसलेले दृश्य
३ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आर्ततेने प्रार्थना करणे, प्रार्थना केल्यावर स्वतःच्या हृदयमंदिरात प्रवेश करता येणे आणि सनातनच्या तीन महागुरूंचे दर्शन होणे : १८.६.२०२० या दिवशी मला ध्यानामध्ये दिसले, ‘गुरुदेवांच्या कृपेने माझ्याकडून त्यांना पुष्कळ आर्तभावाने प्रार्थना झाली. प्रार्थना केल्यानंतर कोणताही अडथळा न येता मी माझ्या हृदयमंदिरात प्रवेश करू शकले. ते मंदिर एवढे विशाल होते की, ते पाहून मी आश्चर्यचकित झाले. मी एकदम लहान झाले होते. माझ्या मनात विचार आला, ‘एवढ्या लहान शरिरात एवढे मोठे हृदयमंदिर कसे ?’ माझे हृदयमंदिर सोनेरी प्रकाशाने प्रकाशित झाले होते आणि माझ्यासमोर अतीविशाल सिंहासनावर विष्णुस्वरूप गुरुदेव विराजमान होते. मला तिन्ही महागुरु (परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ) अत्यंत विशाल स्वरूपात दिसत होते. हे सर्व अनुभवत असतांना मला सद़्गुरु काकांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.’
३ आ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांवर तुळशीपत्र वाहिल्यावर ते प्रसन्न होतील’, या विचाराने त्यांच्या चरणी तुळशीपत्र वहाण्याचा प्रयत्न करणे; मात्र साधिकेतील कर्तेपणाच्या विचारामुळे तुळशीपत्र हवेत उडणे : माझ्या मनात विचार आला, ‘गुरुदेव तुळशीपत्र वाहिल्यावर प्रसन्न होतील. त्यांना तुळशीपत्र वाहूया.’ तेव्हा माझ्या मनात ‘मी माझ्या प्रयत्नांनी गुरुदेवांना प्रसन्न करून घेईन’, असा कर्तेपणाचा विचार होता. मी त्यांच्या चरणी तुळशीपत्र वहायला गेल्यावर तुळशीपत्र हवेत उडाले. मी रडतच ते तुळशीपत्र पकडण्यासाठी त्याच्या मागे धावत होते; परंतु ते माझ्या हातामध्ये येत नव्हते.
३ इ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे देवीरूपात दर्शन होणे आणि त्यांनी साधिकेच्या मस्तकाला स्पर्श केल्यावर तिच्या मनात शरणागतभाव निर्माण होणे : मला अतिदिव्य दैवी रूपात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ दिसल्या. त्यांच्याकडून पुष्कळ दिव्य तेज प्रक्षेपित होत होते. त्यांची वेशभूषा देवीसमान होती. त्यांचा चेहरा अत्यंत करुणामय होता. त्यांनी माझ्या मस्तकाला हळूवारपणे स्पर्श केला. तेव्हा माझ्या मनामध्ये अत्यंत शरणागतभाव निर्माण झाला.’
३ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांची अनुभवलेली कृपा ! : गुरुदेवा, मी एवढेच पाहू शकले. मला वाटले, ‘दयाघना, परम कृपाळू गुरुदेव, ‘आपण माझ्याकडे हसून पहावे’, ही माझी इच्छा होती. तुम्ही मला माझ्यातील कर्तेपणाची जाणीव करून दिली. श्रीस्तशक्ति (सौ.) सिंगबाळ यांना माझी दया येऊन त्यांनी मला आपल्याला प्रसन्न करण्याचा उपाय सांगून तसे करण्यासाठी शक्ती दिली.’
४. प्रार्थना
गुरुदेव, आपणच या जिवातील अहं नष्ट करून मला आपल्या चरणी शरणागत ठेवा. या ब्रह्मांडात मला आपल्याविना कुणाचाच आधार नाही. मी आपल्या चरणी शरण आले आहे. गुरुदेव, माझ्यावर कृपा करावी.’
– सौ. सानिका संजय सिंह, वाराणसी. (१९.६.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |