(म्हणे) ‘अटक करण्यात आलेल्यांना केवळ आरोपी म्हणावे, आतंकवादी नाही !’ – गृहमंत्री जी. परमेश्वर, कर्नाटक
|
बेंगळुरू (कर्नाटक) – ‘अटक करण्यात आलेल्यांना केवळ आरोपी म्हणावे, त्यांना सध्या आतंकवादी म्हणता येणार नाही’, असे संतापजनक वक्तव्य राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी नुकत्याच अटक करण्यात आलेल्या ५ जिहादी आतंकवाद्यांच्या संदर्भात केले. या आतंकवाद्यांकडून स्फोटके, ७ गावठी बंदुका, ४२ जिवंत काडतुसे, २ चाकू, ४ ग्रेनेड आदी शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्यानंतरही जी. परमेश्वर यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केल्यामुळे भाजपने त्यांच्यावर टीका केली आहे. माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी ‘काँग्रेस लांगूलचालनाचे राजकारण करत असून आतंकवादी घटनांच्या संदर्भात गंभीर नाही’, असा आरोप केला.
Row over Karnataka Home Minister G. Parameshwara’s remarks
The minister’s remarks are to reach out to a particular radicalised group: @TomVadakkan2
Ever since Congress has come to power in Karnataka, certain anti-India sections…: @Offtejasvisurya tells @dpkBopanna pic.twitter.com/XujnX2urRY
— TIMES NOW (@TimesNow) July 20, 2023
दुसरीकडे कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी जी. परमेश्वर यांच्यावर टीका होत असल्यावरून त्यांची पाठराखण करत म्हटले की, घटनेचे अन्वेषण चालू असून सर्वांनी यासंदर्भातील सविस्तर माहिती समोर येईपर्यंत थांबावे.
कर्नाटक पोलिसांनी नुकतेच सैयद सुहेल, उमर, जनिद, मुदासिर आणि जाहिद या ५ आतंकवाद्यांना अटक केली. या सर्वांना बेंगळुरू येथील कनकनगर येथील एका धार्मिक स्थळाजवळ मोठे षड्यंत्र रचत असतांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले.
संपादकीय भूमिका
|