कारवाईसाठी आम्ही थोडा वेळ देऊ, अन्यथा आम्हीच पावले उचलू !
सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला फटकारले !
नवी देहली – आम्ही सरकारला कारवाई करण्यासाठी थोडा वेळ देऊ, अन्यथा आम्हीच पावले उचलू. कालचा व्हिडिओ पाहून आम्ही व्यथित झालो आहोत. या प्रकाराविषयी आम्ही चिंता व्यक्त करतो. सरकारने पुढे येऊन पावले उचलली पाहिजेत आणि कारवाई केली पाहिजे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकार यांना मणीपूरमध्ये महिलांना विवस्त्र करून धिंड काढल्याच्या प्रकरणी पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणावर उद्या, २१ जुलै या दिवशी पुढील सुनावणी होणार आहे.
मणिपुर में दो महिलाओं को नग्न कर घुमाने का मामला सुप्रीम कोर्ट तक पहुंच गया है। शीर्ष न्यायालय ने घटना पर स्वत: संज्ञान लिया है और सुनवाई की तारीख 28 जुलाई तय की है। #manipur #manipurviolence #supremecourt #indiangovernment
यहां पढ़ें पूरी खबर – https://t.co/3kxYJ1Rw72 pic.twitter.com/MU1BehRMGa
— Hindustan (@Live_Hindustan) July 20, 2023
न्यायालयाने म्हटले की, अशा हिंसाचाराच्या विरोधात गुन्हेगारांवर गुन्हा नोंद करण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांची माहिती न्यायालयाला दिली पाहिजे. हिंसाचाराचे साधन म्हणून महिलांचा वापर करून मानवी जीवनाचा भंग करणे घटनात्मक लोकशाहीच्या विरोधात आहे.