मेरठ (उत्तरप्रदेश) येथील मंदिरातील पुजारी निघाला मुसलमान !
पोलिसांनी घेतले कह्यात !
मेरठ (उत्तरप्रदेश) – मेरठच्या मटौर गावातील शनि मंदिरात पुजारी म्हणून असणारी व्यक्ती गुल्लू खान नावाची मुसलमान असल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी खान याला कह्यात घेतले आहे. तो मूळचा हरियाणाच्या पानीपत येथील रहाणारा आहे.
शनि मंदिर का पुजारी ‘गुर्जरनाथ महाराज’ निकला गुल्लू खान: पुराना परिचित मिला तो खुल गया भेद, हिन्दू संगठनों के विरोध के बाद पुलिस ने लिया हिरासत में#Meerut #ShaniTemplehttps://t.co/WPX8A4h50o
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 19, 2023
१. जानेवारी २०२३ पासून तो या मंदिरात पुजारी आहे. त्याने स्वतःचे नावे गुर्जरनाथ महाराज असे सांगितले होते. तसेच तो पूर्वी हरियाणाच्या डिगलबेरी रोड येथील बाबा गोरखनाथ मंदिरात पुजरी होता. त्यानंतर मटौर गावातील लोकांनी त्याला मंदिराच्या स्वच्छतेचे काम दिले होते.
२. काही मास त्याच्याविषयी कुणाला शंका आली नाही. दोन दिवसापूर्वी गुल्लू खान याला ओळखणारी कृष्णपाल नावाची व्यक्ती या मंदिरात आली होती. कृष्णपाल यांनी गुल्लू याला ओळखले आणि त्यांनी गावकर्यांना गुल्लू याची खरी माहिती सांगितली. हिंदु संघटनांना ही माहिती समजल्यावर त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याला कह्यात घेतले. त्याचे आधारकार्ड पाहिले असता तो मुसलमान असल्याचे उघड झाले.
संपादकीय भूमिका
|