छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी हडपून ‘लँड जिहाद’ करणारा ‘वक्फ कायदा’ रद्द करा ! – हिंदु जनजागृती समितीचे आजरा आणि चंदगड येथे निवेदन
कोल्हापूर – छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी ‘लँड जिहाद’द्वारे हडपणारा ‘वक्फ’चा काळा कायदा रद्द करण्यात यावा, अशा मागणीचे केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री यांच्या नावे असलेले निवेदन आजरा अन् चंदगड येथे हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने देण्यात आले. आजरा येथे तहसीलदार समीर माने यांनी निवेदन स्वीकारले. या प्रसंगी हिंदुत्वनिष्ठ नाथा देसाई, संदीप पाडळे, युवराज पोवार, बामणे, भोसले, माद्याळकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. आनंदराव साठे यांसह अन्य उपस्थित होते.
चंदगड येथे श्रीराम सेनेचे श्री. महांतेश देसाई आणि श्री. तुकाराम मरगाळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. दयानंद पाटील, तसेच अन्य धर्मप्रेमी उपस्थित होते.
सांगली – सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार अनंत गुरव यांनी निवेदन स्वीकारले. या प्रसंगी धर्मप्रेमी सर्वश्री महेश चव्हाण, गणेश सगरे, अभिजित कोडग, प्रथमेश बावडेकर, अमित कुटे, शुभम होसमठ आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई उपस्थित होते.