कर्णावती (गुजरात) येथे भीषण अपघातात ९ जण ठार, तर १५ जर घायाळ
कर्णावती (गुजरात) – येथे १९ जुलैच्या रात्री इस्कॉन पुलावर जग्वार चारचाकी गाडीने २५ जणांना ठोकले. यात ९ जण ठार झाले, तर १५ जण घायाळ झाले. मृतांमध्ये एक पोलीस हवालदार आणि एक गृहरक्षक दलाचा सैनिक यांचा समावेश आहे.
अहमदाबाद में इस्कॉन ब्रिज पर भीषण सड़क हादसा, सड़क हादसे के बाद मौका-ए-वारदात पर खड़े लोगों को जगुआर कार ने रौद दिया। इस हादसे में पुलिस कांस्टेबल समेत 9 लोगों की मौत हो गई। pic.twitter.com/qnKO51Cjdi
— News18 Uttar Pradesh (@News18UP) July 20, 2023
महिंद्रा थार नावाची चारचाकी पुलावर डंपरला धडकली होती. हा अपघात पहाण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. या वेळी राजपथ क्लबकडून ताशी १६० किलोमीटर वेगाने येणार्या जग्वार या चारचाकी गाडीने या लोकांना धडक दिली. या घटनेत ६ जण जागीच ठार झाले. या अपघातात जग्वार गाडीचा चालकही घायाळ झाला आहे.