गोवा : पीडित मुलीची ‘इन कॅमेरा’ जबानी नोंदवण्यास प्रारंभ
महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्यावरील बलात्काराच्या आरोपाचे प्रकरण
मडगाव, १९ जुलै (वार्ता.) – महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या विरोधातील बलात्काराच्या प्रकरणी मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा आणि सत्र न्यायालयात पीडित मुलीची ‘इन कॅमेरा’ जबानी नोंदवण्यास प्रारंभ झाला आहे.
Victim girl’s deposition before Margao Court in Babush Monserrate rape case begins https://t.co/IjYnpcsUwG
— Goemkarponn (@goemkarponnlive) July 18, 2023
या प्रकरणी दक्षिण गोवा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश इर्शाद आगा यांच्यापुढे सुनावणी चालू आहे. या प्रकरणी अनेकांच्या जबान्या नोंदवण्यात आल्या आहेत. अभियोग पक्षाच्या वतीने या प्रकरणी सरकारी अधिवक्ता व्ही.जी. कोस्ता बाजू मांडत आहेत.