श्री भवानीदेवीचे शिवकालीन अलंकार गायब झाल्याचे उघड !
तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – श्री तुळजाभवानी मातेचे मौल्यवान आणि शिवकालीन अलंकार गायब झाले असल्याचे समोर आले आहे. श्री तुळजाभवानीदेवीच्या चरणी आतापर्यंत अर्पण करण्यात आलेल्या शिवकालीन दागिन्यांची आणि अन्य सर्व मौल्यवान वस्तूंची मोजणी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने १८ जुलै या दिवशी अहवाल सादर केला. या अहवालात देवीचे अनेक मौल्यवान दागिने गायब असल्याचे उघड आले आहे.
श्री तुळजाभवानीदेवीच्या अलंकारांची मोजणी करण्यासाठी जुन्या सूचींचे संदर्भ घेतले गेले. वर्ष १९६३, १९९९ आणि २०१० मध्ये देवीला अर्पण झालेल्या दागिन्यांची सूची बनवण्यात आली होती. त्या सूचींनुसार दागिने आहेत कि नाहीत याची ‘इन कॅमेरा’ (कॅमेराच्या देखरेखीखाली) पडताळणी केली गेली. त्यानंतर या अहवालात दागिने गायब असल्याचे समोर आले आहे.
संपादकीय भूमिका :मंदिरांचे सरकारीकरण झाल्याचा दुष्परिणाम ! देवीचे मौल्यवान दागिने सांभाळून ठेवायलाही न जमणारे अकार्यक्षम सरकारी विश्वस्त ! |