‘औ’चा ‘औरंगजेब’ याऐवजी ‘औदुंबर’ या शब्दांचा वापर कोकणी उजळणी पुस्तकात ते बनवणार्यांनी का केला नाही ? अशांवर सरकार कारवाई का करत नाही ?
‘कोकणी उजळणी पुस्तकात ‘औ’ अक्षराची ओळख करून देतांना ‘औरंगजेब’ असा उल्लेख आणि औरंगजेबाचे रेखाचित्र छापण्यात आले आहे. यामुळे गोवा राज्यात नवीन वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे म्हणाले, ‘‘हे पुस्तक शिक्षण खात्याचे नाही आणि हे पुस्तक वापरत असलेल्या शाळांचा शोध घेतला जात आहे. हे पुस्तक वापरणार्यांवर कारवाई केली जाणार आहे. मी सर्व भागांतील शिक्षणाधिकार्यांना पुस्तकाचा वापर करणार्या शाळांचा शोध घेण्याचा आदेश दिला होता; मात्र अशा शाळांचा शोध लागू शकला नाही.’