पाकिस्तानमधील शरिया कायदा मानणारे हे जिहादी लोक !
वन्दे मातरम्’ म्हणणार नाही’, असे म्हणणार्या अबू आझमी यांच्यावर आमदार नीतेश राणे यांचा घणाघात !
मुंबई, १९ जुलै (वार्ता.) – अबू आझमीसारख्या हिरव्या सापाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटनाच मान्य नाही. अफगाणिस्तान, पाकिस्तान येथे मानला जातो तो शरिया कायदा मानणारे हे लोक आहेत. हे जिहादी विचारसरणीचे लोक आहेत, अशी टीका भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यावर केली. आझमी यांनी विधानसभेत ‘वन्दे मातरम्’ म्हणणार नाही. आम्ही केवळ अल्लापुढे नतमस्तक होतो’, असे विधान केले. याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला आमदार नीतेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली.
— nitesh rane (@NiteshNRane) July 19, 2023
या वेळी नीतेश राणे म्हणाले, ‘‘अशा हिरव्या सापांना आपल्या देशामध्ये किती मिनिटे, किती घंटे आणि किती वर्षे ठेवायचे ? याविषयी विचार करण्याची आणि याविषयी भूमिका घेण्याची वेळ आता आली आहे. सर्वधर्मसमभावाचा ठेका केवळ हिंदूंनी घेतलेला नाही. सगळे नियम आणि कायदे हिंदूंनीच पाळायचे. हिंदूंनी सर्व धर्माच्या देवांना मानायचे आणि तुम्ही केवळ अल्लाला मानणार, या भूमिकेला आमचा आक्षेप आहे. याच जिहादी विचारांच्या विरोधात हिंदु समाज मोर्चा काढत आहे. अशा हिरव्या सापांना ठेचल्याविना समाजामध्ये पालट होणार नाही.’’