दंगलखोर धर्मांधाची तळी उचलून अबू आझमी यांचा हिंदूंना दंगलखोर ठरवण्याचा प्रयत्न !
मुंबई, १९ जुलै (वार्ता.) – मार्च २०२३ मध्ये छत्रपती संभाजीनगरमधील रोशनगेट येथे हिंदूंवर आक्रमण करत मुसलमानांनी दंगल घडवली. ही दंगल थोपवण्यासाठी पोलिसांनी रबरी गोळ्यांचा मारा केला. यामध्ये एका धर्मांधाचा मृत्यू झाला होता. ‘मृत्यू झालेला मुसलमान युवक स्वत:च्या घराच्या परिसरात असतांना पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला’, असे आझमी म्हणाले आणि त्यांनी पोलिसांना गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न केला. ‘दंगल हिंदूंनी घडवली’, असे भासवून सभागृहात बोलतांना अबू आझमी हिंदूंना दंगलखोर ठरवण्याचा प्रयत्न करत होते; मात्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दंगलीमागील सत्यता सभागृहात मांडली. त्यातून पोलिसांच्या गोळीबारात ठार झालेला मुसलमान युवक दंगलीत सहभागी असल्याचा प्रकार पुढे आला. याविषयीचे सर्व व्हिडिओ चित्रीकरण पोलिसांकडे उपलब्ध असल्याचे गृहमंत्र्यांनी सभागृहात सांगितल्यानंतर ‘ज्या धर्मांध युवकाला अबू आझमी निष्पाप म्हणत होते, तो दंगल घडवण्यात सहभागी असल्या’चा प्रकार सभागृहात उघड झाला.
(सोजन्य : ABP MAJHA)
छत्रपती संभाजीनगर येथील घटनेविषयी अबू आझमी यांनी १९ जुलै या दिवशी सभागृहात लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. ‘या घटनेत मृत्यू झालेला मुनिरोद्दिन शेख निर्दाेष होता. पोलिसांनी त्याला जाणीवपूर्वक मारले’, असा आरोप अबू आझमी यांनी सभागृहात केला. मृत मुसलमान युवकाला ५० लाख रुपये हानीभरपाई देण्याची मागणीही अबू आझमी यांनी या वेळी केली होती. ‘श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात सकल हिंदू समाजाकडून ज्या फेर्या काढण्यात आल्या, त्यामध्ये मुलसमानांना अपमानित करण्यात आले’, असे आझमी यांचे म्हणणे होते.
‘वन्दे मातरम्’ म्हणण्याच्या घोषणेमुळे दंगल घडल्याचा अबू आझमी यांचा कांगावा !या लक्षवेधी सूचनेवर बोलतांना हिंदूंकडून ‘इस देश मे रहना होगा, तो वन्दे मातरम् कहना होगा’, अशा घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले. ‘वन्दे मातरम्’च्या घोषणेमुळे दंगल झाल्याचा कांगावाही या वेळी अबू आझमी यांनी केला. |