जगभरातील हिंदूंनी पाकमधील हिंदूंवर होणार्या अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवायला हवा ! – दानिश कनेरिया, पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी खेळाडू
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमधील ऐतिहासिक मंदिरे नष्ट केली जात असतांना आंतरराष्ट्रीय सुमदाय शांत का आहे ? येथे प्रतिदिन धर्मांतर, अपहरण, बलात्कार आणि हत्या यांच्या असंख्य घटना घडत आहेत. येथे धार्मिक स्वातंत्र्य नाही. जगभरातील हिंदूंनी पाकमधील हिंदूंवर होणार्या अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवायला हवा, असे ट्वीट पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आणि हिंदु असलेले दानिश कनेरिया यांनी केले.
Why is the Intl. Community silent on the demolition of historical temples in Pakistan?
Countless atrocities like conversion, kidnapping, rape & murder are happening everyday. There is no freedom of religion.
Hindus all over the world should raise their voice against injustice. https://t.co/cEbY59HOW3
— Danish Kaneria (@DanishKaneria61) July 17, 2023
मागील ४ दिवसांत पाकमधील हिंदूंच्या दोन मंदिरांवर आक्रमण करण्यात आले. त्यावरून कनेरिया यांनी वरील ट्वीट केले. कनेरिया हे हिंदु असल्यामुळे त्यांना पाकिस्तानी क्रिकेट संघाकडून अपमानित केले गेले आणि खेळण्याची पुरेशी संधी दिली गेली नाही, असा आरोप स्वत: कनेरिया यांनी काही वर्षांपूर्वी केला होता.
संपादकीय भूमिकापाकिस्तानी हिंदूंच्या व्यथेवर तर नाही; परंतु किमान भारतीय हिंदूंवर होणार्या अत्याचारांच्या विरोधात तरी सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, सौरव गांगुली, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली आदी आजी अथवा माजी क्रिकेटपटू कधीच काही बोलत नाहीत, हे जाणा ! अशांना बहुसंख्य हिंदूंनी तरी मोठे का करावे, असे कुणी विचारल्यास आश्चर्य वाटू नये ! |