जम्मू-काश्मीरमध्ये २ आतंकवादी ठार

महाराष्ट्रातील २ हिंदु कामगारांवर आतंकवाद्यांकडून गोळीबार !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे नियंत्रणरेषेजवळ  १९ जुलैच्या सकाळी घुसखोरी करणार्‍या २ आतंकवाद्यांना सुरक्षादलांनी ठार केले. या आतंकवाद्यांकडून ४ एके रायफली आणि ६ हँडग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. १८ जुलै या दिवशी अनंतनाग जिल्ह्यात आतंकवाद्यांनी महाराष्ट्रातील अक्षय आणि सौरव या २ हिंदु कामगारांवर गोळीबार केला होता. यात हे कामगार घायाळ झाले होते. ते एका दागिन्याच्या दुकानात काम करतात. ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या आतंकवादी संघटनेचे मुखपत्र असलेल्या ‘कश्मीर फाइट’ने या आक्रमणाचे दायित्व स्वीकारले आहे.

संपादकीय भूमिका 

काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांना ठार केले, तरी तेथे स्थानिक हिंदू आणि देशातून गेलेले अन्य हिंदू असुरक्षितच आहेत, हे सातत्याने अशा घटनांतून दिसून येते ! ही स्थिती धर्माचरणी लोकांचे धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !