तीर्थक्षेत्रे मद्य-मांस मुक्त करण्यासाठी अधिवेशन झाल्यानंतर बैठक बोलवू ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई, १९ जुलै (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या वेळी श्री. सुनील घनवट यांनी मुख्यमंत्र्यांना पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे झालेल्या वारकरी महाअधिवेशनामध्ये सर्व तीर्थक्षेत्रे मद्य-मांस मुक्त करण्याची, तसेच मंदिर विश्वस्त आणि गड-दुर्ग यांच्या संदर्भात गडप्रेमी संघटनांची बैठक बोलवण्याची मागणी केली.
याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘यासंदर्भात अधिवेशन झाल्यानंतर लवकरच बैठक बोलवण्यात येईल’, असे सांगितले.
|