प्रेमास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीला जिवे मारण्याची धमकी देणार्या धर्मांधाला पुणे येथे अटक !
पुणे – येथील अदनान शेख याने एका १६ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले; परंतु मुलीने त्याच्या प्रेमास नकार दिल्याने शेख याने मुलीचे ‘इन्स्टाग्राम’वर बनावट खाते चालू केले. त्या मुलीचे छायाचित्र त्यावर प्रसारित केले, तसेच तिला चाकूचा धाक दाखवून २ दिवसांत माझ्यासमवेत न आल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी मुलीने तक्रार दिल्यानंतर कोंढवा पोलीस ठाण्यात शेख याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे, तसेच त्याला अटक ही केली आहे.
संपादकीय भूमिका :वासनांध धर्मांधांची वृत्ती पालटत नाही, हे लक्षात घ्या ! त्यासाठी अशा नराधमांना शरीयतनुसार कठोर शिक्षा द्यायला हवी, तसेच अशा संकटाला सामोरे जाण्यासाठी आता मुलींनीही स्वरक्षण प्रशिक्षण घेतले पाहिजे. |