परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या रथोत्सवाच्या वेळी आलेल्या अनुभूती !
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘गुरुदेवांच्या कृपेमुळे मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रथोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. रथाच्या पुढे संत आणि उन्नत साधक होते. मला सर्व संत मोठे अन् तेजस्वी जाणवत होते.
२. त्यांच्या पाठीमागे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ होत्या. ते सर्व मला विराट स्वरूपात दिसत होते. त्यांच्यापुढे आम्ही सर्व साधक एकदम लहान दिसत होतो.
३. सगळे साधक शरणागतभावात होते. त्यांना बघून माझी भावजागृती होत होती.’
– कु. माऊली शिरोडकर, मडगाव, गोवा. (२५.५.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |