बांगलादेशातून भारतात आलेल्या मुसलमान महिलेने हिंदु बनून अजयशी केेले लग्न : नंतर पतीला बांगलादेशात पळवून नेले !
मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात आलेल्या सीमा हैदर या पाकिस्तानी वंशाची महिला आणि सचिन मीना यांचे प्रकरण चर्चेत असतांनाच उत्तरप्रदेशातील मुरादाबादमधूनही असेच एक प्रकरण समोर आले आहे. सीमा-हैदर यांच्याप्रमाणेच बांगलादेशातील ज्युली नावाच्या एका मुसलमान महिलेने फेसबुकच्या माध्यमातून भारतातील हिंदु टॅक्सीचालक अजय याच्याशी ओळख करून नंतर त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढल. नंतर ज्युली तिची ११ वर्षांची मुलगी हलिमा हिच्यासह मुरादाबाद येथे पोचली. ज्युलीने इस्लाम त्यागून हिंदु बनून अजयशी लग्न केले.
Another #SeemaHaider case? #Bangladesh’s Julie marries #Moradabad’s Ajay, cross border love story takes mysterious turnhttps://t.co/l4XT5S6DbL
— DNA (@dna) July 18, 2023
लग्नाच्या एक वर्षानंतर, म्हणजे ३ मासांपूर्वी तिने अजयला व्हिसा नूतनीकरणाच्या बहाण्याने भारत-बांगलादेश सीमेवर नेले आणि तेथून ती अजय याला व्हिसा आणि पासपोर्ट यांच्याविना बांगलादेशात पळवून घेऊन गेली. (यास उत्तरदायी असणार्या अधिकार्यांना तात्काळ कारागृहात टाका ! – संपादक)
४ दिवसांपूर्वी अजयने त्याच्या बहिणीशी भ्रमणभाषवरून संपर्क साधला आणि अडचणीत असल्याचे सांगितले. त्यानंतर लगेच रक्ताने माखलेला अजयचे एक छायाचित्र त्यांना प्राप्त झाले. या प्रकरणी अजयच्या आई-वडिलांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली असून पोलिसांनी या प्रकरणाचे अन्वेषण चालू केले आहे.
संपादकीय भूमिकाहाही लव्ह जिहादच होय ! असे प्रकार रोखण्यासाठी हिंदूंनी सतर्क रहाण्याची, तर सरकारने कठोर पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे ! |