अफगाणिस्तान ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ला आश्रय देत असल्यानेच पाकमध्ये आतंकवादी आक्रमणांत वाढ ! – पाकच्या सैन्याचा आरोप
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकने तालिबानशासित अफगाणिस्तानला ‘शेजारील एक राष्ट्र’ संबोधून गंभीर आरोप केला आहे. पाकमध्ये बंदी असलेल्या ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) या आतंकवादी संघटनेला अफगाणिस्तान आश्रय देत असून त्याला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पुरवत असल्याचा म्हटले आहे. या माध्यमातून पाकिस्तानमध्ये वाढलेल्या आतंकवादी आक्रमणांमागे हे एक महत्त्वाचे कारण आहे, असा आरोप पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानवर केला आहे.
Pakistan army blames Afghanistan for providing sanctuaries to militants belonging to TTP and other groups.
The army’s statement comes after 12 of its soldiers died in two separate attacks last week.https://t.co/kP1O4Ewzqk
— Arab News Pakistan (@arabnewspk) July 17, 2023
संपादकीय भूमिकातालिबानला मोठ्या करणार्या पाकला आज तोच तालिबान डोईजड झाला आहे. संकटात सापडलेल्या पाकला त्याचे हे दुष्कर्मच उत्तरदायी आहे, याला कोण काय करणार ? |