गुजरातमध्ये आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्यावरून हिंसाचार : ७ जण घायाळ
८ धर्मांध मुसलमानांना अटक
गांधीनगर (गुजरात) – गुजरातमधील पाटण येथील बालिसाना गावात मुसलमानांच्या संदर्भात आक्षेपार्ह धार्मिक मजकूर प्रसारित केल्यावरून झालेल्या हिंसाचारात ७ जण घायाळ झाले. उपचारार्थ त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी १२ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांतील ८ धर्मांध मुसलमानांना मशीद चौक परिसरातून अटक केली आहे.
गुजरात में विवादित धार्मिक पोस्ट की वजह से 2 पक्षों के बीच हिंसा हुई है। इस हिंसा में घायल हुए करीब 7 लोगों को हॉस्पिटल में एडमिट करवाया गया है। #Gujarat https://t.co/IJbuHXxz7a
— India TV (@indiatvnews) July 17, 2023
हा मजकूर प्रसारित झाल्यानंतर या गावात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी येथील मशिदीजवळ दोन्ही गटांमध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या वेळी वादविवाद झाल्यानंतर हिंसाचार झाला. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या गावातील एका सामाजिक गटामध्ये हा मजकूर प्रसारित करण्यात आली होती. यावरून मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावल्याने तणाव निर्माण झाला.