पाकसाठी हेरगिरी करणार्या तिघांना जन्मठेपेची शिक्षा !
अशा लोकांना सरकारने शोधून पाकमध्ये पाठवले पाहिजे ! – न्यायालयाचे मत
कर्णावती (गुजरात) – येथील न्यायालयाने १७ जुलै या दिवशी भारताची हेरगिरी केल्याच्या प्रकरणी ३ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. करामत अली फकीर उर्फ सिराजुद्दीन (वय २४ वर्षे), मोहम्मद आयूब शेख (वय २३ वर्षे) आणि नौशाद अली (वय २३ वर्षे) अशी या तिघांची नावे आहेत. ते भारताच्या सैन्य ठिकाणांची गोपनीय माहिती पाकची गुप्तचर संस्था आयएस्आयला पुरवत होते. न्यायालयाने या तिघांना शिक्षा सुनावतांना म्हटले की, हे तिघेही भारताचे नागरिक आहेत. या तिघांनाही भारतात रोजगार मिळाला; मात्र त्यांचे भारतावर प्रेम नाही आणि त्यांच्यात देशभक्तीचीही भावना नाही. त्यांचे पाकिस्तानवर प्रेम असून पाकविषयी देशभक्ती दिसून आली. त्यामुळेच त्यांनी भारताची गुप्त माहिती पाकला दिली. भारतात राहून भारताचे नागरिक असतांनाही पाकसाठी हेगिरी करणार्यांनी स्वतःहून देश सोडून गेले पाहिजे किंवा सरकारने अशा लोकांना शोधून त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवले पाहिजे.करामत अली फकीर उर्फ सिराजुद्दीन, मोहम्मद अयूब शेख और नौशाद अली
1. करामत अली फकीर
2. मोहम्मद आयूब शेख
3. नौशाद अलीभारतीय सेना की जानकारी पाकिस्तान भेजते थे। कोर्ट ने कहा है- इनमें देशप्रेम नहीं है। ऐसे लोगों को देश से बाहर कर देना चाहिए।#Gujarat #Court https://t.co/6JfhBOuK7K
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 18, 2023
कर्णावती पोलिसांनी १४ ऑक्टोबर २०१२ मध्ये जमालपूर येथे रहाणारा फकीर, तर कर्णावती येथे रहाणारा अयूब यांना अटक केली होती. जोधपूर (राजस्थान) येथून नौशाद अली याला २ नोव्हेंबर २०१२ या दिवशी अटक केली होती. फकीर वर्ष २००७ मध्ये पाकमध्ये जाऊन आला होता.
संपादकीय भूमिकाअशा देशद्रोह्यांना आजन्म पोसण्यापेक्षा त्यांना फाशीचीच शिक्षा दिल्यास इतरांवरही यामुळे वचक बसेल, असे देशभक्त भारतियांना वाटेल ! |