हरिद्वार (उत्तराखंड) येथे कावड यात्रेकरूंवर अज्ञातांकडून दगडफेक !
हरिद्वार (उत्तराखंड) – येथून गंगाजल घेऊन येणार्या कावड यात्रेकरूंवर रामपूर भागात अज्ञातांनी दगडफेक केली. यामुळे तणाव निर्माण झाला. कावड यात्रेकरूंनी दगडफेक करणार्यांवर कारवाई करण्यासाठी येथे आंदोलन केले. त्यामुळे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात येथे फौजफाटा तैनात केला. कावड यात्रा प्रतिवर्षी श्रावण मासामध्ये चालू होते. यात कावडद्वारे हरिद्वार येथून गंगाजल आणून स्थानिक ठिकाणी शिवमंदिरात जलाभिषेक केला जातो.
(सौजन्य : ETV Bharat Uttarakhand)
संपादकीय भूमिकाउत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार असल्याने हिंदूंच्या तीर्थयात्रेकरूंच्या संदर्भात अशा प्रकारची घटना घडू नयेत, असे हिंदूंना वाटते ! यामागे जे कुणी आहेत, त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक ! |