लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायद्यासाठी अधिवेशनात पावले उचलू ! – नितेश राणे, आमदार, भाजप
मुंबई – सध्याचे सरकार हे हिंदुत्वाच्या विचारांचे सरकार आहे. त्यामुळे उत्तरप्रदेश, कर्नाटक आणि गुजरात राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात एक सक्षम धर्मांतर बंदीचा कायदा, तसेच लव्ह जिहाद विरोधी कायदा निर्माण होणे आवश्यक आहे.
यंदाच्या विधानसभा अधिवेशनात या कायद्याच्या संदर्भात पुढचे पाऊल उचलले जाईल. सत्तेत नव्याने सहभागी झालेल्या अजित पवार यांचाही हिंदुत्ववादी सरकारला पाठिंबा आहे.