रामनाथ (अलिबाग) येथे तोतया पोलीस उपनिरीक्षकास अटक !
रामनाथ (अलिबाग) – वाहतूक शाखेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असल्याचे सांगत शाळकरी मुलांना मार्गदर्शनासाठी आल्याचे सांगणार्या तोतया पोलिसाला महाड पोलिसांनी अटक केली आहे. अनिकेत मिस्त्री असे त्याचे नाव आहे.
तो महाड तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, नागाव येथे पोलीस अधिकार्याच्या वेशात येऊन रायगड पोलीस दलात वाहतूक शाखेत कर्तव्यावर असल्याचे सांगितले. त्याचे वागणे संशयास्पद वाटल्याने शाळा प्रशासनाने पोलिसांना कळवले. मिस्त्री पोलिसांच्या वेशात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होता. त्याच वेळी पोलिसांनी त्याला कह्यात घेऊन विचारणा केल्यावर तो तोतया असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाअशांना कठोरात कठोर शिक्षा झाल्यासच पुन्हा कुणी तोतया पोलीस होण्यास धजावणार नाही ! |