स्वधर्मानुसार सर्वंकष विचार करणारे हिंदू आणि घातक मनोवृत्तीचा प्रत्यय देणारे धर्मांध प्रवृत्तीचे मुसलमान !
संभाव्य ‘समान नागरी कायद्या’च्या पार्श्वभूमीवर कालसुसंगत लिखाण !
नुकतेच केंद्रशासनाच्या विधी आयोगाने ‘समान नागरी कायद्या’साठी नागरिकांकडून सूचना मागवल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ‘सर्व नागरिकांना समान कायदा आणि समान निर्बंध असावेत’, असे सर्वांना वाटते; पण मुसलमान समाजाला तसे वाटत नाही, यामागील कारणमीमांसा करणारा लेख येथे देत आहोत.
१. धर्म आणि संस्कृती यांची आदर्शमय शिकवण !
१ अ. ब्रह्मांडात सर्वत्र ईश्वराचे अस्तित्व असल्याची शिकवण भारतीय संस्कृती देते ! : भारतीय संस्कृती आणि हिंदु धर्म हा मानवतेची शिकवण देतोे. सेवाभाव हा भारतीय संस्कृतीने श्रेष्ठ मानला आहे. चराचरामध्ये ईश्वराचे अस्तित्व आहे. त्यामुळे सर्वत्र भगवंत व्यापलेला असून ‘त्याचे अस्तित्व नाही’, असे ब्रह्मांडात कोणतेही स्थान नाही; म्हणूनच कळत नकळत जरी एखादी वस्तू, पदार्थ, व्यक्ती यांपैकी कशालाही आपला पाय लागला, तरी तात्काळ नमस्कार करण्याची शिकवण संस्कृतीने आपल्याला दिलेली आहे.
१ आ. जिव्हाळा, आपुलकी, त्याग आणि समर्पण यांचे महत्त्व ! : कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करा, म्हणजे परस्परांमधील जिव्हाळा टिकून राहील. कर्तव्यदक्षता बाळगा, म्हणजे आपुलकी मिळेल. आत्मीयता अंगी बाणवा, म्हणजे कोणत्याही गोष्टीचा त्याग करणे सहज शक्य होईल. प्रत्येकावर उत्कट प्रेम करा, म्हणजे समर्पणाची भावना निर्माण होईल. मानवाचे जीवन सुखी होण्यासाठी जिव्हाळा, आपुलकी, त्याग आणि समर्पण यांची भावना या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
आपल्या संस्कृतीने दिलेली ही शिकवण केवळ हिंदु धर्मासाठी नाही, तर अखिल मानवजातीसाठी आहे; पण दुर्दैवाने याकडे पाठ फिरवून हिंदु धर्माला दूषणे देण्याचे काम सध्या चालू आहे.
१ इ. आदर कशाचा करावा ? : ‘दुसर्यांच्या भावभावनांचा आदर करायचा असतो’, अशी शिकवण हिंदु धर्माने दिली असली, तरी त्या सद़्भावना असतील, तरच त्यांचा आदर करावा. ‘दुष्ट भावनांचा आदर करा’, अशी शिकवण आपली संस्कृती आपल्याला देत नाही. त्याचप्रमाणे बुद्धीभेद करणे वाईट; पण दुर्बुद्धीभेद करावाच लागतो. प्रार्थना करतांनासुद्धा ‘धर्माचा विजय असो आणि अधर्माचा नाश होवो’, असेच म्हटले जाते.
२. मुसलमानांमधील उणिवा !
२ अ. सद़्सद्विवेकबुद्धी नाही ! : आज जगात घडणार्या घटनांकडे आपण दृष्टीक्षेप टाकला, तर अमानवीय कृत्ये करणार्या लोकांना ‘आमच्या भावना जपल्या गेल्या पाहिजेत, आमच्या आदरस्थानांना कुणीही धक्का लावू नये’, अशी अपेक्षा असते. मुसलमानांनी हिंदूंची अनेक मंदिरे भुईसपाट केली. अनेक मंदिरांचे मशिदीत रूपांतर केले. त्यांच्या या कृत्यामुळे हिंदूंच्या श्रद्धास्थानांना धक्का लागला. हिंदूंची मंदिरे त्यांच्या हातातून हिसकावून घेतली. आता वैध मार्गाने ती परत मिळावीत; म्हणून हिंदूंनी प्रयत्न केलेला मुसलमानांना चालत नाही. त्यांना ठाऊक आहे की, त्यांनी हिंदूंच्या मंदिरांवर अनधिकृतपणे आपला अधिकार गाजवला आहे. हातून झालेली चूक सुधारण्याची आणि दुसर्याची मालमत्ता त्याला परत करण्याची त्यांच्यातील सद़्सद्विवेकबुद्धी काही जागी होत नाही; कारण तो विवेकच त्यांच्याजवळ नाही.
२ आ. अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा अधिकार मुसलमानेतरांनाही आहे, हे लक्षात न घेणे : हिंदूंच्या देवतांची विकृत चित्रे काढणे, हे मुसलमानांचेे अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे. त्यामुळे त्याविरोधात ‘जर कुणी आमच्या भावना दुखावल्या’, असे म्हणून आक्षेप घेतला, तर मुसलमान समाजाला ते चालत नाही. त्यांच्या दृष्टीने ती राज्यघटनेची पायमल्ली होते. ‘असाच अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा अधिकार मुसलमानेतरांनाही आहे’, ही गोष्ट मात्र त्यांच्या पचनी पडत नाही.
२ इ. मुसलमानांची दुटप्पी भूमिका सामाजिक ऐक्यासाठी धोकादायक ! : ‘सर्व नागरिकांना समान कायदा आणि समान निर्बंध असावेत’, असे सर्वांना वाटते; पण मुसलमान समाजाला तसे वाटत नाही. त्यांना कधी ‘राज्यघटना’ सोयीस्करपणे प्रिय असते, तर कधी ‘शरीयत’ प्रिय असतो. त्यांची ही दुटप्पी भूमिका सामाजिक ऐक्यासाठी धोका निर्माण करणारी आहे. त्यांच्या या अशा दुटप्पी भूमिकेतून ते स्वतःची प्रत्येक अडचणीतून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करतात.
२ ई. मुसलमानांची वृत्ती त्यांच्याच नाशाला कारणीभूत ठरेल ! : देशातील सर्व सुखसोयी, सर्व प्रकारच्या सवलती, तसेच अमर्याद हक्क त्यांना हवे असतात; पण त्यांच्या दुटप्पी वर्तनावर अंकुश ठेवणारी कोणतीही गोष्ट त्यांना मान्य नसते. जगात सर्वत्र त्यांची हीच दुहेरी भूमिका आहे. त्यांच्या या भूमिकेचा संपूर्ण मानवजातीला त्रास होतो. त्यांची ही स्वार्थी वृत्ती, अहंगंड, अरेरावी, तसेच त्यांचे क्रौर्य हे सर्व त्यांच्याच नाशाला कारणीभूत होणार आहे; पण हे त्यांच्याच लक्षात येत नाही.
२ उ. अन्य धर्मांविषयी आदर नसणारे मुसलमान ! : ते इतर कोणत्याही समाजासह सहजीवन जगू शकत नाहीत. ‘इतरांनी मुसलमान धर्माचा मान राखावा’, अशी त्यांची इच्छा असते; पण ‘त्यांनीसुद्धा इतर धर्माविषयी आदर बाळगावा’, असे त्यांना कुणी सांगितल्यास ते त्यांना मान्य होत नाही.
३. कुठे इस्लामिक आणि ख्रिस्ती देश, तर कुठे सर्व धर्मियांचा आदर करणारा हिंदुस्थान !
जगातील हिंदुस्थान हा एकमेव देश असा आहे की, जेथे देशातील सर्व धर्मांच्या अनुयायांना त्यांच्या त्यांच्या सणांच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी घोषित दिली जाते. इस्लामिक देशात रहाणार्या हिंदूंच्या सणांसाठी मात्र सार्वजनिक सुट्टी घोषित करण्यात येत नाही. ख्रिस्ती राष्ट्रांमध्येही अन्य धर्मियांच्या सणांना सार्वजनिक सुट्टी घोषित करण्यात येत नाही. हिंदु धर्माने मात्र ‘इतरांच्या भावनांची जोपासना करा, तोच मानवाचा खरा धर्म आहे’, अशी शिकवण दिली; पण तशी शिकवण अन्य धर्म त्यांच्या अनुयायांना देत नाहीत, असेच या उदाहरणावरून निश्चित होते. सर्व धर्मियांविषयी आदरभाव जपणार्या हिंदूंनाच वेठीला धरले जाते. त्यांनाच सहिष्णुतेचा धडा शिकवला जातो. अशा ‘चोराच्या उलट्या बोंबा’ सर्वत्र चालू आहेत.
४. विविधतेला ‘विषमता’ म्हणून घोषित केल्याचा परिणाम !
संपूर्ण विश्वात आपल्याला एकसमानता आढळत नाही. विविधता हीच निसर्गाची देणगी आहे. निसर्गाच्या या देणगीकडे दुर्लक्ष करून आपली विकृत वृत्ती जोपासण्यासाठी पाशवी वृत्तीच्या लोकांनी विविधतेला ‘विषमता’ म्हणून घोषित केले. परिणामी सहजीवनाऐवजी संघर्षात्मक जीवनाचा मार्ग स्वीकारला. त्यामुळे सामाजिक ऐक्य, बंधूभाव, आपुलकी नष्ट झाली.
५. विकृतींच्या विरोधात मौन बाळगल्याने अराजकतेचा प्रादुर्भाव !
जिव्हाळा, आपुलकी, आत्मीयता आणि समर्पणाची भावना या गोष्टींचे महत्त्वच राहिलेले नाही. परिणामी विद्वेष, अहंकार, क्रूरता, लबाडी, असत्य, अनैतिकता आणि अन्याय अशा विकृती जगभर पसरल्या आहेत. स्वतःला जगातील सुशिक्षित, सुविद्य आणि सुसंस्कृत समजणारा समाजसुद्धा या विरोधात मौन बाळगून बसला आहे. याची परिणती संपूर्ण जगात अशांतता आणि अराजकता यांचा प्रादुर्भाव वाढण्यात होत आहे. हीच गोष्ट मानवी समाजाला अत्यंत हानीकारक आहे.
६. उन्मत्तांनी हे लक्षात घ्यावे !
दुसर्याचा नाश करून स्वतः सुखी जीवन जगण्याचा प्रयत्न करणारे कधीही सुखाने जगू शकत नाहीत. दुसर्याचा नाश करण्यासाठी उचललेले पाऊल हे स्वतःच्या विनाशाच्या कडेलोटाकडे टाकलेले पहिले पाऊल आहे. ही गोष्ट उन्मत्तांना कळत नाही. ‘दुसर्याच्या अंगावर जेव्हा आपण चिखल फेकतो, तेव्हा आपला हात प्रथम चिखलात जातो’, ही साधी गोष्ट या स्वार्थांध किंवा धर्मांध यांना कळत नाही.
७. अन्य धर्म नष्ट करणार्यांनी स्वतःच्या भविष्याचा विचार करावा !
अन्य धर्म नष्ट करून केवळ स्वतःचा धर्मच या भूतलावर टिकवण्यासाठी प्रयत्न करणारे स्वतःचा धर्म नष्ट करत आहेत, हे त्यांच्या लक्षातच येत नाही. जसे कर्म तसे फळ पदरात पडते. दुसर्याला अत्तर लावायला गेल्यावर प्रथम आपलाच हात सुगंधित होतो. दुसर्याचा विनाश करायला गेलो, तर आपलाच विनाश आधी होतो. हा निसर्गाचा न्याय आहे. ही निसर्गाची शिकवण आहे. निसर्गाच्या न्यायासमोर कुणीही टिकत नाही. हेच सत्य ! आता त्याचाच आरंभ होत आहे. संपूर्ण जगातून इस्लामिक आक्रमकतेला होणारा विरोध मुसलमानांनी वेळीच ओळखावा आणि स्वतःच्या वर्तनात सुधारणा करावी. अर्थात् यातून ते काही बोध घेतील, याची सुतराम शक्यता नाही. हे तेवढेच खरे आहे.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक (५.७.२०२३)
संपादकीय भूमिकाभारतात मुसलमान आणि ख्रिस्ती सणांना सुटी असते; परंतु मुसलमान अन् ख्रिस्ती देशांत हिंदु सणांना सुटी नसते, हे जाणा ! |