हिंदूंनो, वेळीच जागृत व्हा, अन्यथा भूमीच नाही, तर घरदारही हे धर्मांध बळकावतील ! – बाळासाहेब जाधव महाराज, मुख्य पुजारी, दत्तगड देवस्थान भोंगवली
‘वक्फ’चा काळा कायदा रहित करण्यात यावा, या मागणीसाठी भोर (पुणे) येथील आंदोलन
भोर (जिल्हा पुणे), १७ जुलै (वार्ता.) – हिंदूंनो, वेळीच जागृत व्हा, अन्यथा आपल्याला मुक्तपणे वावरणेही कठीण होईल. देवस्थानाच्या भूमी धर्मांध बळकावत आहेत. आपण आज जागृत झालो नाही, तर आपल्या भूमीच नाही, तर आपले घरदारही हे धर्मांध बळकावतील. त्यासाठी या भेदभावपूर्ण कायद्याच्या विरोधात समस्त हिंदूंनी संघटित होऊन याला विरोध करावा, असे आवाहन ‘दत्तगड देवस्थान भोंगवली’चे मुख्य पुजारी आणि व्यवस्थापक श्री. बाळासाहेब जाधव महाराज यांनी केले.
या वेळी ‘स्वयंभू प्रतिष्ठान रायरेश्वर’चे अध्यक्ष श्री. शंकर जंगम, आम्ही भोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. समीर घोडेकर, रवी सोहं दत्त फाऊंडेशनचे श्री. सचिन देशमुख, जय जवान मित्र मंडळ, भोर येथील कार्यकर्ते, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी आदी मान्यवर यांच्यासह मोठ्या संख्येने हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
ज्यांना पाकिस्तान, बांगलादेश दिला त्यांना मनमानी करून भूमी बळकावण्याचे पाशवी अधिकार दिले गेले ! – सुभेदार श्री. कुणाल मालुसरे
वर्ष २०१३ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने ‘वक्फ बोर्ड अधिनियम १९९५’द्वारे मुसलमानांना पाशवी अधिकार दिले आहेत. एका मोठ्या षड्यंत्राद्वारे देशभरातील भूमी हडपण्याचा अतिशय गंभीर प्रकार वक्फ कायद्याच्या माध्यमातून चालू आहे. परिणामी देशभरात ८ लाख एकरहून अधिक भूमीची मालक ‘वक्फ बोर्ड’ झाला आहे. वक्फ बोर्ड कायद्यामुळे हिंदूंना कोणतेही अधिकार राहिलेले नाहीत. देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी या भूमीवर रक्त सांडले आहे, त्यांच्या घराण्याला या देशात कोणताही अधिकार नाही; मात्र ज्यांना आपण पाकिस्तान, बांगलादेश दिला आहे, त्यांना मनमानी करून भूमी बळकावण्याचे पाशवी अधिकार दिले गेले आहेत. त्यामुळे या कायद्याच्या विरोधात समस्त हिंदूंनी संघटित व्हावे आणि हा कायदा रहित करण्यासाठी सरकारला भाग पाडावे.
हिंदूंची भूमी बळकावणारे ‘वक्फ बोर्डच भूईसपाट झाले पाहिजे ! – ह.भ.प. उमेश महाराज शिंदे
हिंदूंची भूमी बळकावणारे ‘वक्फ बोर्डच भूईसपाट झाले पाहिजे, यासाठीच सगळ्यांनी प्रयत्न करावा. ज्या ठिकाणी अधर्म आहे, त्या ठिकाणी शास्त्र आणि शस्त्र उचलले पाहिजे. आपले अस्तित्व टिकवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे आणि आपले जे हिंदु राष्ट्र आहे, त्यावर कायमस्वरूपी शिक्कामोर्तब केले पाहिजे.
वैशिष्ट्यपूर्ण
- ह.भ.प. बाळासाहेब जाधव महाराज हे अपंग असून काठीचा आधार घेऊन चालतात. महाराज २४ कि.मी. अंतरावर असलेल्या भोंगवली गावातून आंदोलनासाठी भोरला आले होते. पुष्कळ पाऊस पडत असतांनाही जाधव महाराज ३ वाहने पालटत भोरला पोचले.
- स्वयंभू प्रतिष्ठान, रायरेश्वरचे अध्यक्ष श्री. शंकर जंगम आंदोलनाच्या दिवशी निगडी (पिंपरी-चिंचवड) येथून भोरला आंदोलनासाठी आले.
- पुण्यातील एका दांपत्याने आंदोलनस्थळी ‘विषय आम्हाला आवडला आणि पुण्यात भेटूया’ असे सांगितले.
- एका चारचाकीमध्ये अन्य गावातील काही युवक जात होते, त्यांनी आंदोलन पाहून उत्स्फूर्तपणे घोषणा दिल्या.आंदोलन झाल्यावर उपस्थित धर्माभिमानी आणि जिज्ञासू यांनी ‘आंदोलनातील विषय महत्त्वाचा असून असे होणे आवश्यक आहे, आम्हाला आंदोलन आवडले’, असे मत व्यक्त केले.
आंदोलनाला लाभली वरुण देवतेची कृपा !
आंदोलनाच्या दिवशी दुपारी १२ नंतर पाऊस चालू होता; मात्र आंदोलन चालू झाल्यावर पाऊस थांबला आणि काही ऊन पडले. आंदोलन होईपर्यंत ढगाळ वातावरण राहिले; पण पाऊस आला नाही. |