६४ कोटी ३६ लाख रुपयांचे अमली पदार्थ नष्ट !
महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाची कारवाई !
मुंबई – महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाकडून ६४ कोटी ३६ लाख रुपयांचे अमली पदार्थ १७ जुलै या दिवशी नष्ट केले. या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ऑनलाईन उपस्थितीत ‘ड्रग्स ट्रॅफिकिंग अँड नॅशनल सिक्युरिटी’ या विषयावर देहली येथे परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई!
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून ६४ कोटी ३६ लाख रूपयाच्या अंमलीपदार्थ सोमवारी नष्ट केले. यावेळी केंद्रीय गृह अमित शाह यांच्या व्हर्चुअल उपस्थितीत ‘ड्रग्स ट्राफिकिंग अॅण्ड नॅशनल सिक्युरिटी’ या विषयावर दिल्ली येथे परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
— पवन/Pawan 🇮🇳 (@ThePawanUpdates) July 17, 2023
या वेळी त्यांनी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे नष्ट करण्यात येणार्या मालाचा आढावा घेतला. त्या वेळी आतंकवादविरोधी पथकाने ४ गुन्ह्यांमध्ये जप्त केलेले एकूण १६१ किलो वजनाचे (अंदाजे किंमत ६४ कोटी ३६ लाख रुपये) अमली पदार्थ नवी मुंबईतील तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी लि. येथील बंदिस्त भट्टीमध्ये जाळून नष्ट केले.