हिंदु जनजागृती समिती देत असलेले धर्मशिक्षण घेऊन ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात लढा देऊ !
पाजपंढरी (दापोली) येथील कार्यशाळेतील हिंदु युवकांचा निर्धार !
दापोली, १७ जुलै (वार्ता.) – तालुक्यातील पाजपंढरी येथील ‘मल्हार बॉईज’चे १६ युवक हर्णे येथील हिंदु जनजागृती समितीच्या कार्यशाळेसाठी आले होते. या कार्यशाळेतून प्रेरणा घेऊन त्यांनी ११ जुलै या दिवशी पाजपंढरी येथील होमवाले मंडळी सभागृहात समितीच्या कार्यशाळेचे आयोजन केले. या कार्यशाळेला ७० धर्मप्रेमी आणि जिज्ञासू उपस्थित होते. या वेळी दीपप्रज्वलन पाजपंढरी येथील श्री. नंदकुमार चोगले यांनी केले. या कार्यशाळेत ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ याविषयी डॉ. हेमंत चाळके, तर ‘जीवनातील साधनेचे महत्त्व’ हा विषय श्री. परेश गुजराथी यांनी मांडला. या कार्यशाळेसाठी ‘मल्हार बॉईज’चे श्री. दीपेश दोरकुलकर, श्री. अरविंद तांडेल आणि श्री. गणेश तांडेल यांनी विशेष प्रयत्न केले.
अभिप्राय
१. श्री. नंदकुमार गोविंद चौगुले – भारत देशाची फाळणी धर्माच्या आधारावर झाली. पाकिस्तान हा ‘मुस्लिम देश’ आणि भारत मात्र ‘निधर्मी देश’ ही संकल्पनाच अयोग्य आहे. काँग्रेसने जाणीवपूर्वक हिंदु धर्मावर अन्याय केला आहे. हिंदूसंघटन, धर्मशिक्षण आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण याविषयी वेळोवेळी मार्गदर्शन मिळावे.
२. श्री. दीपेश दोरकुलकर – देशात हिंदु मुलींविषयी जे घडतेय ते आपण एकत्र येऊन आणि धर्मशिक्षण घेऊन हा लढा दिला, तरच थांबेल. हिंदु जनजागृती समितीमुळे आम्हाला धर्मशिक्षण मिळत आहे. अशा कार्यशाळा गावोगावी व्हायला हव्यात.
३. श्री अरविंद तांडेल – आम्हाला धर्माविषयी पुष्कळ काही शिकायला मिळाले, हेच शिक्षण येथे सर्वांना मिळावे; म्हणून या कार्यशाळेचे आयोजन आम्ही केले.
हर्णे येथील कार्यशाळेत ५५ धर्मप्रेमी उपस्थितहर्णे येथे झालेल्या कार्यशाळेत हर्णे, कर्दे, पाळंदे, पाजपंढरी, आंजर्ले आणि केळशी येथून ५५ धर्मप्रेमी उपस्थित होते. या कार्यशाळेला सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांची वंदनीय उपस्थिती लाभली. या वेळी समितीचे श्री. विनय पानवळकर यांनी ‘जीवनातील साधनेचे महत्त्व’ आणि डॉ. चाळके यांनी ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या शेवटी धर्मप्रेमींनी आपापल्या भागात धर्मशिक्षणवर्ग आणि स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग राबवण्याचे ठरवले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सभागृह आणि तेथील सर्व व्यवस्था यांसाठी हर्णे येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. रवींद्र मेहेंदळे यांनी, तर चहा-पाण्याची व्यवस्था ‘जय भवानी प्रतिष्ठान’चे श्री. दीपक खेडेकर यांनी केली. |